IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचा गृहमंत्री अमित शहांवर पलटवार, म्हणाले – ‘हॉटेल ब्लू सीमध्ये काय ठरलं होतं?’

by nagesh
Sanjay Raut | what happened hotel sea blue worli mumbai shivsena mp sanjay rauts retaliation against home minister amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे पुणे दौऱ्यावर (Pune) असून त्यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवली. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेनेवर अमित शहा यांनी निशाणा साधला. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीपूर्वी मातोश्रीवर बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल आणि सत्ता आल्यास तेच मुख्यमंत्री होतील, असे माझ्या उपस्थितीत ठरले होते. मात्र, तरीही शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केल्याची टीका त्यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शहांच्या या टिकेला प्रत्युत्तर दिल आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

संजय राऊत म्हणाले, अमित शहांचे हे विधान असत्याला धरुन आहे. शिवसेनेनं हिंदुत्त्वाचा मुद्दा कधी सोडला नाही. २०१४ पासून हिंदूत्वाचा अपमान भाजपने पावलोपावली केला आहे. निवडणूकांपूर्वी वरळीच्या Hotel Blue Sea मध्ये युती करण्याचा एक सोहळा झाला होता. त्यावेळी दोघांकडूनही एक शब्द देण्यात आला होता. ५०-५० असा ठरला होता. पॉवर शेअरिंग म्हणजे सत्तेचा निम्मा वाटा त्यामध्ये मुख्यमंत्रीपदही येते अशा शब्दात राऊत यांनी अमित शहांवर पलटवार केला आहे. इतकच नाही तर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या आव्हानाला चोख उत्तर दिले. भाजपचे १०५ आमदार निवडणून आले आहेत ते शिवसेनेच्या पाठिंब्यावरच. हिंमत असेल तर १०५ आमदारांनी राजीनामा द्यावा असे राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटले आहे.

शिवसेनेनं विश्वासघात केला – शहा
पुणे दौऱ्यावर असताना गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात महाविकास आघाडी तसेच शिवसेनेवर जोरदार टीका केली.
भाजपबरोबर विश्वासघात करून ज्यांच्याशी लढायचे त्यांच्याच मांडीवर शिवसेना जाऊन बसली आहे.
हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडणुक लढा असे आव्हानही त्यांनी शहा यांनी शिवसेनेला दिले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने अमित शहा यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.
त्यावेळी, त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Sanjay Raut | what happened hotel sea blue worli mumbai shivsena mp sanjay rauts retaliation against home minister amit shah

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांनी सांगितलं विजयाचं गूढ; म्हणाले – ‘आसाममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त मुस्लीम आमदार असायचे, पण अमित शाहांनी…’

Urfi Javed Bold | उर्फी जावेदचे मोनोकनी घातलेले फोटो पाहून नेटकऱ्यांनी केली चक्क मिया खलिफासोबत तुलना; म्हणाले – ‘जाऊन पॉर्न व्हिडिओ बनव’

CP Sadanand Date | सदानंद दातेंच्या ‘वर्दीतल्या माणसाच्या नोंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन; डॉ. अभय बंग म्हणाले – ‘सत्तेच्या संगीत खुर्चीमध्ये पोलिसांपुढे लोकशाही टिकविण्याचे आव्हान’

Related Posts