IMPIMP

Sarsenapati Hambirrao Movie Release Date | बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेला होणार सर्वत्र प्रदर्शित

by nagesh
Sarsenapati Hambirrao Movie Release Date | The release date of the much talked about film Sarsenapati Hambirrao has finally been fixed Will be displayed everywhere on this date

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Sarsenapati Hambirrao Movie Release Date | सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे
(Pravin Tarde) यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना
लागून राहिली होती. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची (Sarsenapati Hambirrao Marathi Movie) मोठ्या उत्सुकतेने वाट
पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. (Sarsenapati Hambirrao Movie Release Date)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर (Sarsenapati Hambirrao Movie Teaser On Social Media) प्रदर्शित झाला होता.
त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली होती.
या चित्रपटात मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वत: प्रविण तरडे साकारत आहेत.
याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. (Sarsenapati Hambirrao Movie Release Date)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहिते पाटील,
सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य,
ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Web Title :- Sarsenapati Hambirrao Movie Release Date | The release date of the much talked about film Sarsenapati Hambirrao has finally been fixed Will be displayed everywhere on this date

हे देखील वाचा :

Benefits Of Not Wearing A Bra | ‘ब्रा’ न घालण्याचे होतील ‘हे’ 10 मोठे फ़ायदे, शक्य तेवढ्या लवकर ’ब्रा’ला करा टाटा-बाय-बाय

Pune Crime | कुंजीरवाडी येथील यात्रेत आलेल्या तरुणाला गुंडाच्या टोळक्याने केली जबर मारहाण; योगेश लोंढे, अभिषेक खेंगरे, शुभम धुमाळ, करण गावडे यांच्यावर गुन्हा

Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Related Posts