IMPIMP

Satara ACB Trap | 2 हजार रुपये लाच घेताना तहसील कार्यालयातील कारकुन आणि खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption Bureau Nanded: Women sarpanch and gram sevak caught in anti-corruption net while fleeing after taking bribe

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन रस्त्याच्या नोंदीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पुर्तता करुन देण्यासाठी दोन हजार रुपये लाच (Accepting
Bribe) स्विकारताना फलटण तहसिल कार्यालयातील (Phaltan Tehsil Office) अव्वल कारकुन (Clerk) आणि एका खासगी व्यक्तीला सातारा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Satara ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.20) करण्यात आली. अव्वल कारकुन
पांडुरंग नामदेव जाधव Pandurang Namdev Jadhav (वय-53) आणि खासगी व्यक्ती अरुण सदाशिव सपकाळ Arun Sadashiv Sapkal (वय-53
रा. फलटण) यांना लाच घेताना सातारा एसीबीने (Satara ACB Trap) रंगेहात पकडले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत एका 33 वर्षाच्या तक्रारदाराने सातारा एसीबीकडे (Satara ACB Trap) तक्रार दिली आहे. तक्रारदार यांना वापरासाठी रस्ता नोंद करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची (Document) पुर्तता करुन देण्यासाठी अव्वल कारकुन जाधव आणि खासगी व्यक्ती सपकाळ यांनी दोन हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी सातारा एसीबीकडे तक्रार केली. अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता दोघांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav),
सातारा एसीबीचे पोलीस उपाधीक्षक सुरज घाटगे (Deputy Superintendent of Police Suraj Ghatge)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत (Police Inspector Sachin Raut),
विक्रम पवार (Police Inspector Vikram Pawar), पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Satara ACB Trap | A clerk in the Tehsil office and a private ISM in the net of anti-corruption while taking a bribe of Rs 2 thousand

हे देखील वाचा :

PCMC Addl Commissioner | राजकीय दबावामुळे स्मिता झगडे यांचा बळी; नियुक्ती रद्द, अतिरिक्त आयुक्तपदावर प्रदीप जांभळे यांची वर्णी

Sachin Sawant | ‘लंपी ने मरत आहेत हजारो गोमाता, गोदी मिडीया भक्त आणि भाजपा नेते मात्र…’, काँग्रेस नेते सचिन सावंतांची मोदी सरकारवर टीका

Maharashtra Politics | भावना गवळीचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर, कालपर्यंत मी त्यांची ताई होते, आज लगेच बाई झाले

Related Posts