IMPIMP

Satara Crime News | साताऱ्यातील धक्कादायक घटना ! भाजपाच्या माजी आमदाराच्या बंगल्याच्या परिसरात आढळला कुजलेला मृतदेह

by nagesh
Satara Crime News | partially buried body was found in the closed bungalow of former bjp mlc kanta nalawade

सातारा : सरकारसत्ता ऑनलाईन   Satara Crime News | येथील वाढे या ठिकाणी अर्धवट पुरलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. याबाबत परिसरात खळबळ माजली आहे. येथील पोलिस मृतदेहाविषयीची माहिती घेत होते. मृतदेह जिथे आढळला तो परिसर भाजपा पक्षाच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांच्या बंगल्याचा असल्याने खळबळ उडाली आहे. (Satara Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुक्यातील वाढे येथे भाजपा माजी आमदार नलावडे यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या परिसरात शुक्रवारी (दि. ३०) अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती पोलिसांना त्वरित देण्यात आली. याप्रसंगी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. (Satara Crime News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

परिसरात साफसफाई करताना कुजलेल्या अवस्थेतील अर्धवट पुरण्यात आलेला मृतदेह आढळला. त्यामुळे हा प्रकार समोर आला. हा मृतदेह महिलेचा आहे की, पुरुषाचा याबाबत ओळख पटविण्याचे काम सुरू असून, पोलीस आसपासच्या लोकांची चौकशी करत आहेत.

तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे पथकासह घटनेच्या ठिकाणी गेले.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मृतदेहाविषयी माहिती घेण्यात येत होती.
वाढे येथे मृतदेह आढळल्याने लोकांनी गर्दी केली होती.
पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title :- Satara Crime News | partially buried body was found in the closed bungalow of former bjp mlc kanta nalawade

हे देखील वाचा :

Alia Bhatt | आलियाच्या लेकीला मिळाली ‘ही’ खास भेटवस्तू; फोटो शेअर करत दिली माहिती

Pune Traffic News | वडगांवशेरी चौक ते खराडी जुना जकात नाका दरम्यान बी.आर.टी. मार्गावरील दोन्ही लेन खुल्या

Pune Crime News | वकिलाची पोलीस अधिकार्‍याला मारहाण; मार्केटयार्ड परिसरातील घटना

Related Posts