IMPIMP

Satara District Sessions Court | सातारा जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ! जन्मदात्या बापाची हत्या करणार्‍या मुलाला अखेर जन्मठेप

by nagesh
HC On Minor Girl Rape Case | 'Intercourse with the consent of a minor girl is rape' - Delhi High Court

सातारा :  सरकारसत्ता ऑनलाइन – Satara District Sessions Court | वडिलांच्या डोक्यावर, तोंडावर फरशीच्या तुकड्याने हल्ला चढवून त्यांचा खून केल्याप्रकरणी मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सातारा जिल्हा सत्र न्यायालयात (Satara District Sessions Court) याबाबत सुनावणी पार पडली. जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे (Judge Mangala Dhote) यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. फलटण (Phaltan) तालुक्यातील साठे फाटा येथे 2018 साली ही घटना घडल्यावर सुरुवातीला ‘हाफ मर्डर’चा, आणि मृत्यूनंतर हत्येचा गुन्हा (FIR) दाखल झाला होता. यावरुन आज कोर्टात निकाल देण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत माहिती अशी, नारायण भिकू इंगळे (Narayan Bhiku Ingle) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. श्यामसुंदर नारायण इंगळे (Shyamsunder Narayan Ingle) (रा. साठेफाटा) असं शिक्षा झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी 30 मे 2018 रोजी विजय रामचंद्र इंगळे (Vijay Ramchandra Ingle) यांनी फलटण ग्रामीण पोलिसांत (Phaltan Rural Police) तक्रार दिली होती. तर, स्टोव्हचा पंप सापडत नसल्याने मुलगा श्यामसुंदर याने वडील नारायण इंगळे यांच्याशी वाद घातला. हा वाद नंतर विकोपाला गेला. संतप्त झालेल्या मुलाने वडिलांवर फरशीच्या तुकड्याने प्रहार केला. डोक्यावर, कपाळावर व कानावर घाव बसल्याने नारायण इंगळे गंभीर जखमी झाले. यानंतर त्यांना उपचारांसाठी दाखल केले असता उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू (Died) झाला. (Satara District Sessions Court)

दरम्यान, याप्रकरणी फलटण ग्रामीणचे फौजदार आर. आर. भोळ (PSI R. R. Bhol) यांनी तपास करून जिल्हा कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने वकील. मिलिंद ओक (Lawyer Milind Oak) यांनी युक्तिवाद करीत 6 साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपी श्यामसुंदर याला जन्मठेप आणि 5000 रुपये दंड सुनावला. दंड न दिल्यास 6 महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. दरम्यान, प्रॉसिक्यूशन पथकाचे हवालदार ऊर्मिला घार्गे (Constable Urmila Gharge), शमशुद्दीन शेख (Shamshuddin Sheikh), सुधीर खुडे (Sudhir Khude), अश्विनी घोरपडे (Ashwini Ghorpade), अमित भरते (Amit Bharate) यांनी सहकार्य केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Satara District Sessions Court | satara district sessions court verdict life sentence fathers murder

हे देखील वाचा :

Pimpri Corona Updates | चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2000 पेक्षा अधिक नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Winter Superfoods For Womens | हिवाळ्यात निरोगी आणि फिट राहण्यासाठी महिलांनी ‘या’ 4 गोष्टी खाव्यात; जाणून घ्या

Maharashtra Rains | महाराष्ट्रात आणखी 3 दिवस मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Related Posts