IMPIMP

Satara Landslide | सातार्‍यात दरड कोसळली; NDRF ने 6 मृतदेह बाहेर काढले, 8 जण अजूनही बेपत्ता

by nagesh
Satara Landslide | story ndrf recovered 6 bodies during the rescue operation in ambeghar satara maharashtra landslide incident

सातारा न्यूज (Satara News): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) सातारा जिल्ह्यातील अंबेघर गावात भूस्खलन (Satara Landslide) झालेल्या ठिकाणावरून शनिवारी 6 मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर 8 जण अजूनही बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने म्हटले की, पाटण तालुक्यातील या गावात झालेल्या भूस्खलनात किमान 16 लोक अडकले असण्याची शक्यता आहे कारण 4 ते 5 घरे दरडीखाली (Satara Landslide) गाडली गेली आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रशासनातील एका अधिकार्‍याने सांगितले की, आम्ही अंबेघरमध्ये शोध तसेच बचावकार्यादरम्यान 6 मृतदेह बाहेर काढले आहेत.
सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, स्थानिक पोलीस, रहिवाशी आणि एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे.

याच तालुक्यात आणखी दोन गावात दुर्घटना

मीरगाव आणि धोखावळेमध्ये सुद्धा भूस्खलन झाले आहे, जिथे अनुक्रमे 12 आणि 4 लोक अडकले असल्याची शक्यता आहे.
अधिकार्‍यांनी सांगितले की, या ठिकाणी सुद्धा बचावकार्य सुरू आहे.
सातार्‍याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यान
रात्री झालेल्या तीन तीन भूस्खलनात सुमारे 30 लोक अडकले असल्याची भीती आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने (आयएमडी) ने शुक्रवारी सातार्‍यासाठी नवीन रेड अलर्ट जारी करून महाराष्ट्रातील या पश्चिम भागातील जिल्ह्यात घाट परिसरात पुढील 24 तास जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला होता.

Web Title : Satara Landslide | story ndrf recovered 6 bodies during the rescue operation in ambeghar satara maharashtra landslide incident

हे देखील वाचा:

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Pune News | मी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना नम्रपणे विनंती करते की….(व्हिडीओ)

Related Posts