IMPIMP

Satara News | दारू विक्रेत्याला महिलांकडून बेदम मारहाण; साताऱ्यातील चिलेवाडीमधील घटना

by nagesh
Satara News | liquor seller was beaten by women in satara chilewadi

सातारा :  सरकारसत्ता ऑनलाईन – Satara News | सातारा जिल्ह्यातील चिलेवाडी या ठिकाणी गावातील काही महिलांनी दारू विकणाऱ्या विक्रेत्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली आहे. याचबरोबर महिलांनी दुकानातील दारूच्या बाटल्या फोडल्या. हा विक्रेता बेकायदेशीरपणे दारू विकत होता. आमचे पती दारू पिण्यासाठी या ठिकाणी येतात असे म्हणत या दुकानदारावर हल्ला केला. (Satara News)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मारहाण केल्यानंतर या महिलांनी विक्रेत्याला वाठार पोलिसांच्या ताब्यात दिले. मार खाताना दुकानदार “मला मारू नका, मला माफ करा, मी पुन्हा दारू विकणार नाही, मी बंद करतो”, असं वारंवार सांगत होता तरीदेखील या महिलांनी त्याला बेदम चोप दिला. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. साताऱ्यातील चिलेवाडी या गावातील महिलांचा रुद्रावतार यावेळी पाहायला मिळाला. या हल्ल्यात दारू विक्रेता मोठ्या प्रमाणात जखमी झाला आहे. (Satara News)

नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूर तालुक्यातील वडझाकन गावामध्ये दारूच्या व्यसनामुळे गावातील सामाजिक, कौटुंबिक वातावरण खराब झाले होते. त्यामुळे गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावात असलेले अवैध दारूचे दुकाने तसेच हातभट्टीवरील दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर ते साहित्य जाळून होळी केली होती. गावामध्ये मागच्या 20 ते 25 वर्षांपासून दारूची हातभट्टी असल्यामुळे गावातील महिला प्रचंड वैतागल्या होत्या.

Web Title :-   Satara News | liquor seller was beaten by women in satara chilewadi

हे देखील वाचा :

Pune Police Crime News | पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह

Joginder Sharma | भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती

Jalna Crime News | नशेच्या भरात पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या; जालन्यामधील घटना

Pune Pimpri Chinchwad Crime News | अल्पवयीन मुलीशी व आईसोबत गैरवर्तन, फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला अटक; पिंपरी परिसरातील प्रकार

Related Posts