IMPIMP

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

by nagesh
Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | This year's Sawai Gandharva Bhimsen Mahotsav canceled on the backdrop of Corona

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनSawai Gandharva Bhimsen Mahotsav | राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची (Corona in
Pune) संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. यामुळे निर्माण झालेल्या
अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला 68 वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव (Sawai Gandharva
Bhimsen Mahotsav) रद्द करण्यात येत असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे (Arya Sangeet Prasarak Mandal) कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी
(Srinivas Joshi) यांनी कळवले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (Bharat Ratna Pandit Bhimsen Joshi) यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने राज्य सरकारने पुण्यातील (Pune) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला परवानगी दिली होती. सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर नियमांचे पालन करत मोहोत्सव आयोजित करण्यात आला होता. तारीख ही ठरली होती. मात्र आता पुन्हा राज्यात आणि पुणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
त्यामुळे यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Sawai Gandharva Bhimsen Mahotsav | This year’s Sawai Gandharva Bhimsen Mahotsav canceled on the backdrop of Corona

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | देशात पुन्हा लॉकडाउन लागणार? PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर आज बैठक

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर वाढल्यास केंद्रीय कर्मचार्‍यांच्या सॅलरीत होईल 50,000 रुपयांच्या जवळपास वाढ, 34 टक्के DA वर लवकरच निर्णय

Pune Crime | चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांकडून अटक, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts