IMPIMP

SBI Doorstep Banking | तुमच्या घरापर्यंत येईल बँक, मोफत देईल सर्व सेवा…जाणून घ्या कसा मिळेल लाभ

by nagesh
application process starting from today september 7 for 5008 ja vacancies apply online at sbi co in

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Doorstep Banking | सामान्य लोकांच्या सोयीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) डोअर स्टेप बँकिंग सेवांचा (Doorstep Banking Services) विस्तार केला आहे. बँकेने सर्वप्रथम कोविड-19 दरम्यान सर्व बँकिंग सेवा घरबसल्या पुरवण्याची सुरूवात केली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले लोक, केवायसी नोंदणी केलेले खातेदार आणि त्यांच्या होम ब्रँचच्या पाच किलोमीटर परिसरात राहणारे इतर सर्व ग्राहक एसबीआयच्या या सेवेचा लाभ घेऊ शकतात. (SBI Doorstep Banking)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय (SBI) ने नुकत्याच केलेल्या Tweet मध्ये सांगितले आहे की दिव्यांग ग्राहक तीन वेळा मोफत बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. बँकेने अपडेटमध्ये म्हटले आहे, एसबीआय तुमच्या दारी !!! एसबीआय एका महिन्यात तीन वेळा ’डोअर स्टेप बँकिंग सेवा’ मोफत देऊन अपंग ग्राहकांना मदत करण्यासाठी येत आहे. एसबीआयने यासोबत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये डोअर स्टेप बँकिंग सेवांचे तपशीलवार वर्णन केले आहे. (SBI Doorstep Banking)

योनो अ‍ॅप (Yono App) द्वारे असे फायदे मिळवा (How to register for SBI doorstep banking service) :

SBI YONO अ‍ॅप उघडा.
सर्व्हिस रिक्वेस्ट मेनूवर जा.
डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिस निवडा.
आता चेक किंवा कॅश कलेक्ट करणे किंवा जे काम असेल ते निवडा.

एसबीआय डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिससाठी असे करा रजिस्ट्रेशन

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक टोल फ्री नंबरवर कॉल करून डोअर स्टेप बँकिंग सेवेसाठी स्वत:ची नोंदणी करू शकतात. बँकेने यासाठी 18001037188 आणि 18001213721 हे दोन टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

डोअर स्टेप बँकिंग सर्व्हिसमध्ये होऊ शकतात ही कामे :

1. कॅश पिकअप.
2. कॅश डिलिव्हरी.
3. चेक पिकअप.
4. चेक स्लिप पिकअप.
5. फॉर्म 15H पिकअप.
6. ड्राफ्टची डिलिव्हरी.
7. टर्म डिपॉझिटची अ‍ॅडव्हाईस डिलिव्हरी.
8. लाईफ सर्टीफिकेट पिकअप.
9. केवायसी डॉक्युमेंट पिकअप.
10. होम ब्रँच रजिस्ट्रेशन.

Web Title : –  SBI Doorstep Banking | sbi doorstep banking services know how to register for free these customers can take benefits

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | बारचालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी, 4 जणांना अटक

Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत 764 रुपयांची घसरण तर चांदीही झाली 1592 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

Related Posts