IMPIMP

SBI PO Exam | भारतीय स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा देताय? मग ही माहिती अवश्य वाचा

by nagesh
SBI PO Exam | sbi po 2022 exam will b in december know about admit card status of sbi po exam

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा भारतीय स्टेट बँक दर वर्षी पिओ म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरच्या (SBI PO Exam) जागा काढत असते. या वर्षीही बँकेने संबंधित पोस्टसाठी जागा काढल्या असून, त्यासाठी हजारो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या वर्षीची पिओची परीक्षा १७ ते २० डिसेंबरदरम्यान होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

म्हणजेच, परीक्षेसाठी (SBI PO Exam) दोन आठवड्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आता उमेदवार परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रवेशपत्र मिळाल्यानंतर उमेदवारांना त्यांचे परीक्षा केंद्र आणि तारीख माहीत होते. पण, सहसा परीक्षेपूर्वी १० दिवस आधी प्रवेशपत्र जारी केले जाते. त्यामुळे प्रवेशपत्र पुढच्या आठवड्याआधी येण्याची शक्यता कमी आहे. प्रवेशपत्राशी संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत संकेतस्थळ sbi.co.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

प्रवेशपत्र जारी झाल्यानंतर, ते काढण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर लिंक सुरू केले जाईल.
त्यानंतर उमेदवार या लिंकला भेट देऊन त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करून प्रवेशपत्र मिळवू शकतील.
मिळालेल्या प्रवेशपत्राची छापील प्रत बरोबर ठेवावी लागेल. ती प्रत अनिवार्य आहे.
तिच्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

परीक्षा संगणकावर होईल, उमेदवाराला इंग्रजी, गणित आणि तर्क या विषयांचे प्रश्न विचारले जातील.
प्रत्येक विभागासाठी 20 मिनिटे वेळ दिलेला आहे. उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा
आणि मुलाखतीनंतर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना विविध शाखांमध्ये पोस्टिंग मिळणार आहे.
स्टेट बँक या वेळेस १६०० पदांवर भरती करणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- SBI PO Exam | sbi po 2022 exam will b in december know about admit card status of sbi po exam

हे देखील वाचा :

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार

INDW vs AUSW | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

Pune Crime | एसटीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी; पुणे-सोलापूर रोडवरील घटना

Pune Accident News | अष्टविनायक महामार्गावर काळाचा कुटुंबियांवर घाला; ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत 3 जण ठार

Related Posts