IMPIMP

SBI Savings Account | SBI मध्ये असेल अकाऊंट तर लवकर उरकून घ्या ‘हे’ काम, अन्यथा भरावा लागू शकतो दंड; जाणून घ्या

by nagesh
SBI Zero Balance | know about sbi zero balance saving account

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI Savings Account | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये तुमचे खाते असल्यास ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही एसबीआय बचत खाते धारक (SBI Savings Account) असाल, तर तुम्ही त्वरीत तुमचे पॅन कार्ड खात्याशी संलग्न करून घ्या. (Link PAN Card To SBI Savings Account)

अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. देशातील सर्वात मोठ्या बँकेने पुन्हा आपल्या ग्राहकांना पॅन कार्ड लिंक करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही तुमचे पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केले नसेल, तर ते त्वरित पूर्ण करा. असे न केल्यास तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

याशिवाय तुम्हाला दंडही होऊ शकतो. बँक खाते पॅन कार्डशी कसे लिंक करायचे ते जाणून घेवूयात…

महत्त्वाचे कागदपत्र आहे पॅन कार्ड

आपल्या देशात ज्या प्रकारे आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, त्याच प्रकारे पॅन कार्ड सुद्धा महत्त्वाचे आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते आर्थिक व्यवहार करण्यापर्यंत पॅन असणे अत्यंत आवश्यक आहे. (SBI Savings Account)

याशिवाय प्राप्तीकर रिटर्न (ITR) भरण्यासाठी, मालमत्ता खरेदी-विक्री तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅन कार्ड खूप महत्त्वाचे झाले आहे. आधार कार्ड आणि बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक आहे.

असे न केल्यास तुमचे पॅनकार्ड निरुपयोगी होईल. तसेच तुमची अनेक कामे अडकू शकतात. असे न केल्यास दंड देखील होऊ शकतो.

इंटरनेट बँकिंगद्वारे पॅन कार्ड असे करा लिंक

सर्वप्रथम onlinesbi.com च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवर, My Accounts मध्ये Profile-PAN Registration वर क्लिक करा.
एक नवीन पेज ओपन होईल जिथे खाते क्रमांक आणि पॅन क्रमांक सबमिट करा.
तुमची विनंती नंतर एसबीआय शाखेकडे प्रक्रियेसाठी पाठवली जाईल.
यानंतर तुम्ही पाठवलेल्या विनंतीवर आठवड्याभरात प्रक्रिया केली जाईल.
तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर खाते आणि पॅन लिंकिंग दिले जाईल.

एसबीआय शाखेला भेट देऊन असे लिंक करा पॅन कार्ड

सर्वप्रथम तुमच्या जवळच्या एसबीआय शाखेला भेट द्या.
तुमच्या पॅन कार्डची प्रत सोबत ठेवा.
त्यानंतर ’रिक्वेस्ट फॉर्म’ भरा.
पॅन कार्डच्या झेरॉक्स प्रतीसह पत्र जमा करा.
पडताळणीनंतर, प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
रजिस्टर मोबाइल नंबरवर लिंकिंग स्थितीबद्दल एसएमएस प्राप्त होईल.

Web Title :- SBI Savings Account | link pan card to sbi savings account to avoid paying penalty

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

हे देखील वाचा :

Blood Circulation Problem Symptoms | चेहर्‍यावरील ‘या’ गोष्टी दर्शवितात रक्ताभिसरण बिघडल्याचे संकेत; तात्काळ लक्ष द्या अन्यथा वाढू शकते समस्या, जाणून घ्या

Pune Crime | सराईत गुन्हेगार सनी हिवाळेच्या खूनाचा बदला घेण्यासाठी हडपसरमध्ये 17 वर्षीय तरूणीचा राडा

Multibagger Stock | वर्षभरापासून मोठी कमाई करून देत असलेला ‘हा’ स्टॉक खरेदी करण्याची अजूनही आहे का संधी ?

Related Posts