IMPIMP

SBI ने जारी केले 2 टोल फ्री नंबर, रविवारी सुद्धा एका कॉलवर पूर्ण होतील अनेक कामे

by nagesh
SBI sbi has issued 2 toll free numbers many works will be completed on one call even on sunday jst

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ते बँकेत फेर्‍या न मारता अनेक कामे पूर्ण करू शकणार आहे. ग्राहकांच्या सोयीसाठी, भारतातील सर्वात मोठ्या बँकेने 2 टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. याच्या मदतीने तुम्ही 5 अत्यंत महत्त्वाची कामे घरी बसून पूर्ण करू शकाल. महत्वाची बाब म्हणजे हे दोन्ही नंबर आठवड्याचे सातही दिवस 24 तास कार्यरत असतील. (SBI)

त्यामुळे ही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रविवारीही थांबावे लागणार नाही. या 2 टोल फ्री नंबरची माहिती एसबीआयने एका ट्विटमध्ये दिली आहे.

स्मार्टफोनशिवायही होईल काम

जे ग्राहक स्मार्टफोन वापरत नाहीत त्यांना या टोल फ्री क्रमांकांचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण टोल फ्री क्रमांकावर कॉल करून ही कामे पूर्ण करता येतील.

एसबीआयने ट्विट करून 18001234 आणि 18002100 हे 2 क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर कॉल करून ग्राहक 5 प्रकारच्या बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील. (SBI)

कोणत्या सुविधांचा ग्राहकांना घेता येईल लाभ ?

1. एसबीआयच्या टोल फ्री क्रमांकावरून, ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती मिळू शकेल.

2. ग्राहक या क्रमांकांवर कॉल करून त्यांचे कार्ड ब्लॉक करू शकतील आणि नवीन कार्डचे स्टेटस जाणून घेऊ शकतात.

3. चेकच्या डिस्पॅच स्थितीबद्दल देखील माहिती मिळवू शकता.

4. या क्रमांकांद्वारे, ग्राहक टीडीएस कपातीशी संबंधित माहिती मिळवू शकतात.

5. ई-मेलद्वारे व्याज प्रमाणपत्र सादर करू शकतात.

6. जुने एटीएम ब्लॉक केल्यानंतर ग्राहक नवीन एटीएमसाठी अर्ज करू शकतात.

Web Title :- SBI | sbi has issued 2 toll free numbers many works will be completed on one call even on sunday jst

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :


Related Posts