IMPIMP

SC On Transgender Petition | तृतीयपंथींच्या ‘या’ मागणीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

by nagesh
SC On Property Dispute | hen gifting assets write kids must look after you sc

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – SC On Transgender Petition | तृतीयपंथींय व्यक्तींच्या बार काउन्सिल नाव नोंदणी शुल्काबाबतच्या मागणीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारत त्यावरच काही सवाल उपस्थित केले आहेत. बार काउन्सिल नाव नोंदणी शुल्क तृतीयपंथींयांसाठी माफ करण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती परंतु याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या याचिकेद्वारे देशातील सर्वाधिक वंचित घटक असणाऱ्या तृतीयपंथींय व्यक्तींना त्यांच्या बार काउन्सिल नाव नोंदणी शुल्कात सवलत देऊन सहायता करण्याबाबतची मागणी करण्यात आली होती. परंतु ही सवलत केवळ याच वर्गासाठी का महिला, अपंग, उपेक्षित व्यक्तींना का नाही असे म्हणून सर्वोच्च न्यायालयाकडून सदर याचिका फेटाळण्यात आली. (SC On Transgender Petition)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बार काउन्सिल नाव नोंदणी शुल्काबाबतच्या या याचिकेवर सरन्यायधीश डी. व्हाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती पी एस नरसिंह यांच्या खंडपीठाकडून सुनावणी करण्यात आली परंतु एका विशिष्ट दुर्बल घटकाचा विचार केल्याचे म्हणत या खंडपीठाकडून ही तृतीयपंथींयांची याचिका फेटाळण्यात आली. (SC On Transgender Petition)

यावर बोलताना सरन्यायधीश डी. व्हाय. चंद्रचूड म्हणाले, नाव नोंदणी शुल्क आकारू नका असे म्हणू शकत नाही, मग फक्त तृतीयपंथींय लोकांनाच का, महिला, अपंग आणि उपेक्षित व्यक्तींना सवलत का नाही असे म्हणत न्यायिक पुनरावलोकनचे मापदंड समजलेच पाहिजेत अशा कठोर शब्दांत सरन्यायधीशांना याचिका कर्त्यांचा कानउघडणी केली आहे.

बार काउन्सिल नाव नोंदणी शुल्कात अशा प्रकारची सवलत देण्यात आली
तर आरोग्य क्षेत्रांसह इतर क्षेत्रांमध्ये देखील ही सवलत दिली पाहिजे असा मिश्किल सवाल सुद्धा सरन्यायधीशांनी यावेळी केला.
दरम्यान ही याचिका मागे घेऊन बार काउन्सिल आॅफ इंडियाकडे याबाबत दाद मागण्याचे सल्ला यावेळी खंडपीठाने याचिकाकर्त्यांना दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- SC On Transgender Petition | transgender petition dismissed by supreme court

हे देखील वाचा :

SBI PO Exam | भारतीय स्टेट बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसरची परीक्षा देताय? मग ही माहिती अवश्य वाचा

Udayanraje Bhosale | उदयनराजे भाजप सोडणार? उद्या निर्णय घेणार

Pune Crime | एसटीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी; पुणे-सोलापूर रोडवरील घटना

Related Posts