IMPIMP

SEBI On Demat Acction Limit | शेयर बाजार गुंतवणुकदारांसाठी मोठा निर्णय, SEBI ने बदलला डीमॅट अकाऊंटचा हा नियम, जाणून घ्या याचा फायदा

June 29, 2024

नवी दिल्ली : SEBI On Demat Acction Limit | शेयर मार्केटमधील छोट्या गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्यासाठी बाजार नियामक सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने बेसिक सर्व्हिसच्या डीमॅट अकाऊंटचे लिमिट २ लाख रुपयांवरून वाढवून १० लाख रुपये केले आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने एका पत्रकात म्हटले आहे की, नवीन मार्गदर्शक तत्वे १ सप्टेंबरपासून लागू होतील.

बेसिक सर्व्हिसच्या डीमॅट खात्यात (BSDA) ठेवलेल्या सिक्युरिटीजच्या मुल्याची मर्यादा वाढवल्याने छोट्या गुंतवणुकदाराने शेयर बाजारात व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे आर्थिक समावेश निश्चित होईल.

बीएसडीए नियमित डीमॅट खात्याची अधिक मुलभूत आवृत्ती असते. छोटा पोर्टफोलियो असलेल्या गुंतवणुकदारांवरील डीमॅट शुल्काचे ओझे कमी करण्यासाठी बाजार नियामक सेबीने २०१२ मध्ये बीएसडीए सुविधा सुरू केली होती.

बीएसडीए अकाऊंटसंबंधी अटी

सेबीने म्हटले की, जर कोणी व्यक्ती एकमेव अथवा प्रथम धारक म्हणून केवळ एक डीमॅट खाते वापरत असेल, सर्व डिपॉझिटरीमध्ये त्याच्या नावावर केवळ एक खाते असेल आणि त्या खात्यात ठेवलेल्या सिक्युरिटीजचे मुल्य कोणत्याही वेळी १० लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल तर तो बीएसडीए खाते ठेवण्यास पात्र आहे.

या बदलापूर्वी बीएसडीएसाठी पात्र होण्यासाठी एकाच डीमॅट खात्यात दोन लाख रुपयांपर्यंत डेबिट सिक्युरिटीज आणि दोन लाख रूपयांपर्यत नॉन डेबिट सिक्युरिटीज ठेवण्याची परवानगी होती. सेबीने म्हटले की, चार लाख रुपयांपर्यंतचे पोर्टफोलियो मूल्य असल्यास बीडीएसएसाठी कोणतेही वार्षिक देखरेख शुल्क लागणार नाही, तर चार लाख रुपयांपेक्षा जास्त आणि १० लाख रुपयांपर्यंतचे पोर्टफोलियो मूल्य असल्यास शुल्क १०० रुपये लागेल.

मात्र, पोर्टफोलियो मूल्य १० लाख रुपयांपेक्षा झाल्यास बीडीएसए आपोआपच नियमित डीमॅट खात्यात बदलले पाहिजे. नियामकाने म्हटले की, बीडीएसए खातेधारकांना इलेक्ट्रॉनिक स्टेटमेंट मोफत दिले जाईल. यासोबत २५ रुपये देऊन फिजिकल खात्याचे स्टेटमेंट घेता येऊ शकते.