IMPIMP

Seed Balls Marathi Movie | एक लाख वृक्षारोपनांचे वचन घेत “सीड बॉल्स”चा मुहूर्त !

by nagesh
 Seed Balls Marathi Movie | Time for "Seed Balls" promising one lakh plantations!

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  Seed Balls Marathi Movie | ”वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे, आळविती. येणे सुख रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष, अंगी येत“. म्हणजेच झाड हे आपल्या निसर्गाचा महत्त्वाचा घटक आहे. वृक्ष आपल्या निसर्गाची शोभा वाढवतात. पर्यावरणाला, निसर्गाला झाडांमुळे सौंदर्य प्राप्त होते. वृक्ष आपल्याला जीवनावश्यक सर्व गोष्टी देतात‌. या एकमेव हेतूने प्रेरणा घेत साज एंटरटेनमेंट निर्मितीसंस्थे अंतर्गत लेखक-दिग्दर्शक अखिल देसाई (Writer-Director Akhil Desai) यांच्या “सीड बॉल्स” या मराठी चित्रपटाचा (Seed Balls Marathi Movie) नुकताच मुहूर्त प्रसिद्ध वास्तु-विशारद तज्ञ अशोक शर्मा (Ashok Sharma) यांच्या हस्ते संपन्न झाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

चित्रपटाविषयी लेखक-दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात का, हल्लीचे जे वातावरण आपण बघतोय, म्हणजे पुर येणे, पाण्याची पातळी खाली जाणे, प्रदूषण (Pollution) वाढले आहे, याला कारणीभूत आहे ते मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड (Tree Felling). ही वृक्षतोड़ होते ती पैसे कमवण्यासाठी, परंतु झाडे जगवून देखील तुम्हाला पैसे कमवता येतात असा संदेश या सिनेमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट (Seed Balls Marathi Movie) मराठी सोबत इतर चार भाषेत डब केला जाणार आहे. चित्रपटात दोन गाणी असणार आहेत.

नोव्हेंबर महिन्यात नाशिक, ठाणे आणि कोकण परिसरात या सिनेमाचे चित्रिकरण होणार आहे.

चित्रपटात सोनिया संजय (Sonia Sanjay), अवनी चव्हाण (Avni Chavan), उदय सबनीस (Uday Sabnis),
दुष्यंत वाघ (Dushyant Wagh) आणि कमलेश सावंत (Kamlesh Sawant)
यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर सलोनी (Saloni), योगेश साठे (Yogesh Sathe), विकास थोरात (Vikas Thorat),
बबन जोशी (Baban Joshi), शरद गुरव (Sharad Gurav) हे इतर भूमिकेत दिसणार आहेत.
छायांकन अजित सिंग (Cinematography by Ajit Singh), संगीत देव अहिरराव (Music by Dev Ahirrao),
गीते विनोद पितले (Lyrics by Vinod Pitle) यांचे असणार आहेत.

झाडे लावा, झाडे जगवा आणि जी झाडं आहेत ती जगवने हा या चित्रपटाचा उद्देश आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Seed Balls Marathi Movie | Time for “Seed Balls” promising one lakh plantations!

हे देखील वाचा :

Shanikrupa Heartcare Centre | हृदयविकारांवरील उपचारासाठी 22 वर्ष कार्यरत असलेले एकमेव प्रिव्हेन्टीव्ह कार्डिओलॉजी सेंटर म्हणजे शनिकृपा हार्टकेअर सेंटर

Floating Solar Panel Project | ‘… तर भागवत कराड यांनी एकतरी कागद दाखवावा’, माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे खुले आव्हान

Bappi Lahiri Song | चीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; बप्पी लहरी यांचं ‘हे’ गाणं वाजवून करतायत निषेध

Related Posts