IMPIMP

Shah Rukh Khan | “कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं अन् आता…’; शाहरुख खानने केला मोठा खुलासा

by nagesh
Shah Rukh Khan | shahrukh khan says nobody was taking me in action films he want to do such movies for next 10 years see details

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Shah Rukh Khan | बॉलिवूडचा किंग म्हणून अशी ज्याची ओळख आहे असा शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनंतर पुनरागमन करणार आहे. तो त्याच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने शरीरयष्टीवर मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली आहे. शाहरुख खानने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांसाठी ‘पठाण’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. हा टीझर पाहून त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. यादरम्यान शाहरुख खानने आपल्या मनातील एक खंत बोलून दाखवली आहे. (Shah Rukh Khan)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाला, शाहरुख खान?
“मी कधीच अ‍ॅक्शनपटात काम केलं नाही. सुंदर प्रेमकथेवर आधारित चित्रपट, सामाजिक विषयावर आधारित चित्रपट मी केले. नकारात्मक भूमिका मी रुपेरी पडद्यावर साकारल्या. पण कोणीच मला अ‍ॅक्शनपटामध्ये घेत नव्हतं,” अशी खंत शाहरुख खानने यावेळी बोलून दाखवली. (Shah Rukh Khan)

तसेच तो म्हणाला, “आता मी 57 वर्षांचा आहे. पुढील काही वर्षे मला अ‍ॅक्शनपटात काम करायचं आहे.
‘मिशन इम्पॉसिबल’सारखे चित्रपट मला करायचे आहेत. अगदी टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची माझी इच्छा आहे.”
शाहरुख पुढील दहा वर्षे तरी फक्त अ‍ॅक्शनपट चित्रपटच करणार आहे.
तसेच टॉपचे अ‍ॅक्शनपट चित्रपट करण्याची इच्छा असल्याचे त्याने यावेळी बोलून दाखवले.
शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
हा चित्रपट बॉक्स ऑफसवर हिट होतो की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shah Rukh Khan | shahrukh khan says nobody was taking me in action films he want to do such movies for next 10 years see details

हे देखील वाचा :

IND vs BAN | वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीऐवजी ‘या’ गोलंदाजाला देण्यात आली संधी

Joe Root | चेंडू चमकवण्यासाठी जो रुटने लढवली अनोखी शक्कल; Video व्हायरल

Kolhapur Crime | चुलतीवर बलात्कारप्रकरणी पुतण्याला 10 वर्षांची सक्तमजुरी, कोल्हापूरमधील घटना

Sanjay Raut | गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात; ‘मग त्या राज्यपाल आणि मंत्र्यांना द्या’ – संजय राऊत

Related Posts