IMPIMP

Shahaji Bapu Patil | अजित पवारांना वाटतं आपण पुन्हा पहाटे शपथ घेऊ पण…, अजित पवारांना शहाजी बापू पाटलांचा टोला

by nagesh
Shahaji Bapu Patil | shinde group mla shahaji bapu patil taunt opposition leader ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Shahaji Bapu Patil | सरकारी अधिकार्‍यांवर पवार कुटुंबाचे दवाबतंत्र पहिल्यापासून आहे. यामध्ये काय नवीन नाही. पण, कोणताही अधिकारी या दबावाला बळी पडणार नाही. अजित पवारांना (Ajit Pawar) वाटतं आपण पहाटे शपथ घेऊन सरकार स्थापन करू. मात्र, अजित पवारांनी पंधरा वर्षे निवांत रहायचं आहे, असा टोला शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवार यांना लगावला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सरकारी अधिकारी (Government officials) आणि कर्मचारी राजकीय भेदभाव करत लोकांची कामे अडवून ठेवत असल्याच्या तक्रारी आल्याने काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी इशारा दिला आहे. अजित पवार म्हणाले होते की, राज्य सरकारच्या (State Government) अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही. अजित पवार यांच्या या वक्तव्यावर आज शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्याला (Dasara Melava 2022) शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी (NCP)
काँग्रेसने मुंबईत ‘मातोश्री’च्या बाहेर बॅनर लावले आहेत. यावर बोलताना शहाजी पाटील म्हणाले,
शिवतीर्थावर राष्ट्रवादीचा मेळावा आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) फक्त मार्गदर्शन करणार आहेत.
शिवाजी पार्कवर (Shivaji Park) जमलेली गर्दी अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गोळा केलेली असेल.
खरे शिवसैनिक (Shiv Sainik) बीकेसी मैदानावर (BKC Ground) असतील.

Web Title :- Shahaji Bapu Patil | shinde group mla shahaji bapu patil taunt opposition leader ajit pawar

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकार गोरगरीबांची दिवाळी गोड करणार, मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय

Anil Deshmukh | राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांना मोठा दिलासा, तब्बल 11 महिन्यानंतर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, पण…

MP Udayanraje Bhosale | तुम्ही म्हणता आम्ही केले मग दाखवा काय केले, उदयनराजेंचा आमदार शिवेंद्रराजेंवर पलटवार

Related Posts