IMPIMP

Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट

by nagesh
Shailesh Lodha | tarak mehta ka oolta chashmah fame actor shailesh lodha wrote special post for vicky kaushal

सरकारसत्ता ऑनलाईन  –  Shailesh Lodha | सध्या अभिनेता विकी कौशल त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडत आहे. ‘मसान’, ‘उरी’, ‘राझी’ यासारख्या चित्रपटातून विकी कौशलने अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर आता विकीच्या नव्या चित्रपटांमुळे तो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढा यांनी विकीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसत आहे. (Shailesh Lodha)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शैलेश लोढा हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून विकीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, “विकी एक उत्तम व लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचबरोबर विकी उत्कृष्ट व्यक्ती देखील आहे. विकीचा नम्रपणा ज्येष्ठ व्यक्तिप्रती असलेला त्याचा आदर आणि त्याचा सरळ स्वभाव यामुळे तो सर्वांच्याच मनात घर करतो. एवढेच नाही तर विकीला माझ्याबद्दल वाटणारा आदर व माझ्यावर असलेल्या प्रेमाला सीमाच नाही”. (Shailesh Lodha)

ते पुढे म्हणाले, “आज खूप दिवसांनी विकी कौशलची अचानक भेट झाली आणि भेटल्यानंतर तो लगेच मला म्हणाला
योगायोग आहे दोन दिवसांपूर्वीच तुमच्याबद्दल बोलत होतो शैलेश भाई…… विकी तू मला भावा सारखा आहेस तू
आयुष्यभर असाच रहा तुझ्यासारखे फार कमी व्यक्ती असतात”.
शैलेश लोढा यांनी विकीसाठी लिहिलेली हि पोस्ट सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.
तर या पोस्टवर भरपूर लाईक व कंमेंट्स येत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shailesh Lodha | tarak mehta ka oolta chashmah fame actor shailesh lodha wrote special post for vicky kaushal

हे देखील वाचा :

Ved Teaser | रितेश-जेनेलियाच्या ‘वेड’ या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीझर रिलीज

NCP Chief Sharad Pawar | राज्यपालांनी मर्यादांचं उल्लंघन केलं, शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरुन शरद पवारांचा कोश्यारींवर संताप

CM Eknath Shinde | ‘जर भविष्य पाहायचं असेल तर, ते ईशान्येश्वर मंदिरात जातील का?” – दीपक केसरकर

Related Posts