IMPIMP

Shakti Mill Gangrape Case | मुंबई हाय कोर्टाचा निर्णय ! शक्ती मिल गँगरेप प्रकरणातील 3 आरोपींची फाशी रद्द

by nagesh
Bombay High Court | mumbai bombay high court bjp girish mahajan maharashtra assembly speaker election governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shakti Mill Gangrape Case | शक्ती मिल गॅगरेप बलात्कार प्रकरणी मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) आज (गुरूवारी) अंतिम निर्णय दिला आहे. हाय कोर्टाने 2013 साली शक्ती मिल गॅगरेप बलात्कार (Shakti Mill Gangrape Case) या प्रकरणातील तीन आरोपींची फाशी रद्द केली आहे. तसेच, या तिन्ही दोषींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आज झालेल्या अंतिम सुनवाणी दरम्यान 5 पैकी 3 आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

2013 मध्ये शक्ती मिल गॅगरेप बलात्कार (Shakti Mill Gang Rape) प्रकरणी 4 डिसेंबर 2014 रोजी मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर 2019 मध्ये हाय कोर्टाने याबाबत याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवर नियमित सुनावणी न्या. साधना जाधव (Justice. Sadhana Jadhav) आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण (Justice. Prithviraj Chavan) यांच्या खंडपीठापुढे पार पडली. सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर या खंडपीठाने निकाल राखून ठेवला होता. आज (गुरुवारी) या खंडपीठाने अंतिम निकाल दिला आहे.

दरम्यान, या गँगरेप प्रकरणात एकूण 5 आरोपी आहेत. त्यात विजय जाधव (Vijay Jadhav),
सलीम अन्सारी (Salim Ansari), सिराज खान (Siraj Khan), कासिम बंगाली (Qasim Bengali)
आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने (Mumbai Sessions Court) आधीच जन्मठेप दिली होती.
प्रकरणातील जो अल्पवयीन आरोपी होता त्याला बाल सुधारगृहात दाखल करण्यात आलं होतं.
बाकी विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात मुंबई हाय कोर्टात (Mumbai High Court)