IMPIMP

Shalu Chourasiya | बागेत फिरणार्‍या अभिनेत्रीवर ‘हल्ला’, चेहर्‍यावर ठोसे मारून केले असे ‘हाल’

by nagesh
 Shalu Chourasiya | shalu chourasiya attacked and robbed in hyderabad while walking on the street badly injured

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shalu Chourasiya | तेलगू अभिनेत्री शालू चौरसीयावर (Shalu Chourasiya) एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये शालूचा मोबाईल चोरी करण्यात आला असून तिला मारहाण (Beat) देखील करण्यात आली आहे. या घटनेनंतर टाॅलिवूडमध्ये (Tollywood) एकच चर्चा रंगली असून अभिनेत्री जखमी असल्याचं समोर आलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

रविवारी रात्री सुमारे साडेआठ वाजता शालू चौरसिया (Shalu Chourasiya) टोनी बंजारा हिल्सच्या KBR पार्कमध्ये चालत होती. यावेळी तिचा फोन हिसकावून घेण्यात आला. या प्रकरणाबाबत अभिनेत्रीने पोलिस ठाण्यात तक्रार देखील नोंदवली (FIR) आहे. तसेच आधी अज्ञात व्यक्तीने शालूला तिच्या कढील मौल्यवान वस्तू आणि पैसे त्याच्या हवाली करण्यास सांगितले. मात्र असं करण्यास शालूने विरोध केल्यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर बुक्की (Punch) मारून तिला दगडाने वार करण्याचा प्रयत्न केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

आरोपी शालूचा फोन हिसकावून घेऊन फरार झाला. तर झालेल्या हल्ल्यामध्ये अभिनेत्रीच्या डोळे आणि डोक्याच्या मधोमध अनेक जखमा (Injuries) झाल्या आहेत. त्यामुळेच अभिनेत्रीला जवळच्या रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार करण्यात आले. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर बंजारा हिल्स पोलीस आरोपीला शोधण्यासाठी संबंधित ठिकाणावरील तसेच आसपासच्या जागेवरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) तपासत आहेत. विशाल पार्कमध्ये नेहमी मोठे लोक तसेच राजकीय नेते देखील आपला वेळ व्यतीत करण्यासाठी येतात. त्यामुळे अनेक वेळा असे हल्ले झाले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Shalu Chourasiya | shalu chourasiya attacked and robbed in hyderabad while walking on the street badly injured

हे देखील वाचा :

MPSC Exam | 20 नोव्हेंबरला असणार्‍या सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र, मार्गदर्शक सूचना जारी

Winter Skin Care Tips | हिवाळ्यात त्वचा ठेवायची असेल समस्यामुक्त तर करू नका ‘या’ गोष्टींचा वापर, त्वचा राहील ‘कोमल’ आणि ‘मुलायम’

Pune Crime | रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं 8.5 लाखांची फसवणूक; पुण्यातील महिला टीसी अधिकाऱ्याला अटक

Related Posts