IMPIMP

Shambhuraj Desai | ‘आम्हाला गद्दार म्हणताना एकच विचार करावा की…’ शंभूराज देसाईंचा ‘गद्दार’ शब्दावरुन अजित पवारांना इशारा

by nagesh
Shambhuraj Desai | cm eknath shinde group mla shambhuraj desai mocks ajit pawar

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइन –  राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) केल्यानंतर शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा थेट सामना पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचवेळी सत्ताधारी विरुद्ध विरोधक असाही राजकीय कलगीतुरा पहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या टीकेचा संदर्भ घेत आज मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी खोचक शब्दात टोला लगावला. तसेच स्थानिक राजकारणावरुन त्यांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला आहे. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) साताऱ्यात माध्यमांशी बोल होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अजित पवार हे उपमुख्यमंत्री असताना मी त्यांच्यासोबत काम केल्याचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी यावेळी सांगितले. कुणी कुणाला गद्दार म्हणावं? अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या दोन खात्यांचा मी राज्यमंत्री (Minister of State) होतो. मी दादांचं काम जवळून पाहिलं आहे. पण अजित पवारांनी आम्हाला गद्दार म्हणताना एकाच गोष्टीचा विचार करावा की हा शिवसेनेतला अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही शिवसेनेतून बाहेर गेलेलो नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, असं देसाई म्हणाले.

तेव्हा त्यांना खरा धक्का बसेल

एकेकाळी सातारा (Satara) राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला होता. आठपैकी सात आमदार राष्ट्रवादीचे होते. आज आठपैकी चार आमदार शिवसेना-भाजपचे (BJP) आहेत. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस निम्म्यावर आली आहे. आम्ही जास्त बोलणार नाही. त्यामुळे 2024 मध्ये यापेक्षा वेगळं चित्र अजित पवारांना पाहायला मिळेल. तेव्हा त्यांना खरा धक्का बसेल, असा सूचक इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.

राष्ट्रवादीचे नेते आमच्या संपर्कात

यावेळी बोलताना देसाई यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादीचे अनेत नेते-पदाधिकारी आमच्या संपर्कात असल्याचा दावा
केला आहे. अजित पवार सत्तेतून बाहेर गेल्यामुळे त्यांचं हे सगळं सुरु आहे.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची काही लोक आमच्या संपर्कात आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात आल्यानंतर आम्हाला गद्दार म्हणायचं, हे सरकार लवकरच पडणार अशी वक्तव्य करुन
त्यांच्यासोबतची माणसं थांबवण्याचं काम अजित पवार करत आहेत.
मात्र 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्यात दूध का दूध, पानी का पानी होईल असे देसाई यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shambhuraj Desai | cm eknath shinde group mla shambhuraj desai mocks ajit pawar

हे देखील वाचा :

Diabetes Diet | ब्लड शुगरच्या रुग्णांनी कोणत्या डाळी, भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्या? पहा यादी

Pune Police | पुण्यात मुलं पळवणारी टोळी सक्रीय ही अफवा, खोटी माहिती पसरवणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई

Health Tips | सर्दी-खोकल्यापासून पचनापर्यंत, ‘हे’ एक सुपरफूड तुम्हाला ठेवते फिट

Nirmala Sitharaman | बारामतीमधील घराणेशाही संपविली तरच बारामतीचा विकास, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा राष्ट्रवादीवर घणाघात

Related Posts