IMPIMP

Shambhuraj Desai | बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

by nagesh
Shambhuraj Desai | shambhuraj desai reply ncp over dada bhuse remark sharad pawar assembly sanjay raut reaction

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 (National Highway No. 48) वरून मुंबई (Mumbai) ते पुणे (Pune) व पुणे ते कोल्हापूर (Kolhapur) या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस (Highway Police), आरटीओ (RTO) स्थानिक पोलीस (Local Police) यांनी संयुक्तपणे कडक कारवाई (Strict Action) करावी, वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी भरारी पथक तैनात करावे, ही मोहीम कायमस्वरूपी राबवावी असे, निर्देश गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज दिले. आज (बुधवार) मंत्रालयात झालेल्या बैठकीत शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी हे आदेश दिले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्याबाबत आज मंत्रालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार महेश शिंदे (MLA Mahesh Shinde), गृहविभागाचे प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना (Sanjay Saxena), वाहतूकचे अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल (Additional Director General of Traffic Kulwant Kumar Sarangal), महामार्ग पोलीस अधिक्षक संजय जाधव (Highways Superintendent of Police Sanjay Jadhav), सुनिता साळुंखे-ठाकरे (Sunita Salunkhe-Thackeray), परिवहनचे वरिष्ठ उपायुक्त अभय देशपांडे (Abhay Deshpande), तर दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया (Special Inspector General of Police  Kolhapur Range Manoj Lohia), सांगली (Sangli), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur), रायगड (Raigad), पुणे जिल्ह्याचे (Pune District) पोलीस अधिक्षक (SP) उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, मुंबई ते पुणे-कोल्हापूर येथील महामार्गावर बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांमुळे वाहतूकीची शिस्त बिघडते. अशा वाहन चालकांमुळे वाहतूक ठप्प होणे (Traffic Jams), अपघात (Accident), वाहतूक ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना होणारा त्रास, विनाकारण प्रवासाला होणारा विलंब आदी समस्या उद्भवल्याचे निदर्शनास येत आहे. या वाहनचालकांवर कडक कारवाई केली पाहिजे. यासाठी महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीसांनी संयुक्तपणे कायमस्वरूपी मोहीम राबवावी. बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी कायमस्वरूपी भरारी पथकाची नियुक्ती करावी. यामुळे  महामार्गावरील वाहतूकीला शिस्त लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उपलब्ध मनुष्यबळातून दैनंदिन नियोजन करावे. राबविलेल्या मोहिमेचा परिणाम दिसावा, यासाठी काटेकोर नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे, अशा सूचनाही गृहराज्यमंत्र्यांनी दिल्या. या महामार्गावरी पोल 36 ते 45 पर्यंत रात्री होणारे अपघात रोखण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने (Maharashtra Road Development Corporation) दिव्यांच्या खांबांची तसेच इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. महामार्गावर निर्माण होणाऱ्या नैसर्गिक अडचणी सोडवूच, परंतु मानवनिर्मित अडचणींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

Web Title :- Shambhuraj Desai | Take stern action against unruly, careless drivers; Instructions by Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम… ‘

Pune Pimpri Crime | पतीचा खून करुन केला गळफास घेतल्याचा बनाव, पत्नीवर FIR

Retirement Investment Planning | निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आयुष्यासाठी ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक; जाणून घ्या सविस्तर

Related Posts