IMPIMP

Shantigiri Maharaj | EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती

by sachinsitapure

नाशिक : Shantigiri Maharaj | पुण्यातील लोकसभा निवडणुकीच्या (Pune Lok Sabha) मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या (Ajit Pawar NCP) नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केली होती (EVM Machine Pooja) , यावरून त्यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला होता. असाच प्रकार पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha) घडला आहे. येथील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएमला हार घातला. याप्रकरणी आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

आज मतदानाच्या दिवशी त्र्यंबकेश्वरमधील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीनला हार घातला.

शांतिगिरी महाराज म्हणाले, आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, ईव्हीएममध्ये पण देव आहे. मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केली. ईव्हीएम मशीनला हार घालण्यापूर्वी शांतिगिरी महाराजांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पुजा करून वंदन केले. हा सर्व प्रकार आदर्श आचारसंहितेचा उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भातील माहिती मागवली आहे. शांतिगिरी महाराज म्हणाले, त्र्यंबकेश्वर येथे अभिषेक झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरांने मला आशीर्वाद दिले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. येथे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आहेत.

Colonel Vaibhav Kale Funeral In Pune | शहीद कर्नल वैभव काळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Related Posts