IMPIMP

Sharad Pawar | गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा धक्का

by nagesh
Maharashtra Election | ncp suspended rebel candidate suspended rebel candidate satish itkelwar nagpur election

गांधीनगर: वृत्तसंस्था – येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात विधानसभेची निवडणूक (Gujarat Assembly Election 2022) होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस आणि आप पक्षासह इतरही लहान मोठे पक्ष रिंगणात उतरले आहेत. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का मिळाला आहे. गुजरातमधील एकूलता एक आमदार कंधाल जडेजा (Kandhal Jadeja) यांनी राष्ट्रवादीला राजीनामा दिला आहे. त्यामुळे शरद पवारांना (Sharad Pawar) हा मोठा धक्का मानला जात आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोरबंदरमधील कुटियाना येथून जडेजा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षाला राम राम केल्याचे सांगितले जात आहे. जडेजा हे 2012 पासून कुटियाना मतदार संघातून निवडून येत आहेत. 2017 साली त्यांनी 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतांनी भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला होता.
पण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाचा व्हिप डावलून भाजपच्या बाजूने मत दिले होते.
त्यामुळे पक्ष त्यांच्यावर नाराज होता.
उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचे राष्ट्रवादीच्या गुजरात प्रदेशाध्यक्षांनी सांगितले आहे.
(Sharad Pawar)

गुजरात विधानसभेत 182 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यावेळी सत्ताधारी भाजपला खाली खेचण्यासाठी
आप (AAP) आणि काँग्रेस (INC) मैदानात उतरली आहे. तसेच या निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान होणार
आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला होणार असून, दुसऱ्या टप्प्यासाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे.
8 डिसेंबरला निवडणुकांची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sharad Pawar | big setback to ncp chief sharad pawar lone mla kandhal jadeja resigns after ticket denial in gujarat election 2022

हे देखील वाचा :

Deepika Padukone And Ranveer Singh | ‘खिडकीतून दगड पडला पण चुंबन थांबले नाही…’, रणवीर सिंहने सांगितला ‘तो’ किस्सा

Pune News | औंध आयटीआयमध्ये १५ नोव्हेंबरपासून अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम

Police Sports Competition | यंदाच्या पोलीस दलाच्या स्पर्धेचा मान पुण्याला, देशातील 2 हजार 639 स्पर्धकांचा सहभाग

Related Posts