IMPIMP

Sharad Pawar | ‘शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’; भाजप नेत्याचं विधान

by nagesh
Sharad Pawar | bjp anil bonde replied and criticizes sharad pawar sanjay raut and nawab malik over allegations

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ट्विटरवर अनिल बोंडे यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप टाकली असून, दंगली भडकावण्याचे काम भाजप नव्हे तर सेक्युलर पक्ष करतात, असं भाष्य अनिल बोंडे यांनी केल्याचे त्यावरुन दिसते. बोंडे खोटे बोलतायत, हे दाखवणारीही ऑडिओ क्लिप मलिकांनी शेअर केलीय. यावरुन भाजप नेते अनिल बोंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut), मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर पलटवार केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अनिल बोंडे म्हणाले, ट्विटरवरील वक्तव्यावर ठाम आहे. मी कधीही हर्बल तंबाखू किंवा दारू पिऊन बोलत नाही. नवाब मलिकसारखे बेहिशेबी बोलण्याची माझी सवय नाही. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) हे हात-पाय बांधलेले गृहमंत्री आहेत. त्यांना प्रत्येक गोष्ट विचारून करावी लागते. त्यामुळे त्यांचं गृह विभागावर नियंत्रण नाही, असा घणाघात अनिल बोंडे यांनी केला आहे.

पुढे अनिल बोंडे (Anil Bonde) म्हणाले, शरद पवार कधीच खोटे बोलत नाहीत असे संजय राऊत यांचे म्हणणे म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असे म्हणण्यासारखे झाले. ज्या राज्यात भाजप सरकार नाही तिथेच दंगली होतात, कारण भाजप सरकार दंगलखोरांवर तातडीने कारवाई करते, असं अनिल बोंडे म्हणाले. तसेच शरद पवार (Sharad Pawar) कोणत्या तोंडाने विदर्भ दौरा करत आहेत, ते माहिती नाही. त्यांना संतप्त शेतकरी आणि नागरिक जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

Web Title :- Sharad Pawar | bjp anil bonde replied and criticizes sharad pawar sanjay raut and nawab malik over allegations

हे देखील वाचा :

Baramati Accident | दुर्देवी ! बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | ‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

IND Vs NZ | 2 देश, 2 अर्धशतकं आणि एकसारखा स्कोअर ! न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूने केला अनोखा रेकॉर्ड

Related Posts