IMPIMP

Sharad Pawar | ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी 3 राज्यांच्या निवडणुका लढणार’ – शरद पवार

by nagesh
MVA Mahamorcha | ncp chief sharad pawar demand to central government call back to governor bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Sharad Pawar | उत्तरप्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूर (Manipur) या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका (5 State Assembly Elections) फेब्रुवारीत होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाच राज्यापैकी 3 राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणूक लढणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. याबाबत माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘राष्ट्रवादी काँग्रेस आगामी पाच पैकी तीन राज्यांच्या निवडणुकीत सहभागी होईल. मणिपूरमध्ये राष्ट्रवादीचे 4 आमदार होते. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (Congress And NCP) मिळून निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली आहे. मणिपूरमध्ये आम्ही एकूण 5 ठिकाणी निवडणूक लढू. असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितलं आहे. तर, गोव्यात काँग्रेस, टीएमसी, राष्ट्रवादीची चर्चा सुरू आहे. गोव्यात काही ठिकाणी आम्हाला निवडणूक लढवायची होती त्याची यादी आम्ही इतर दोन्ही पक्षांना दिली आहे. पुढील दोन दिवसात त्यावर अंतिम निर्णय होईल, असं पवार म्हणाले.

‘उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या पक्षांची युती झाली आहे.
या सर्वांची एक मोठी बैठक होईल. तिथं काही जागा लढवण्यावर आमची चर्चा झाली आहे.
उद्या लखनऊमध्ये जागांची वाटप घोषित होईल.
तसेच, पुढील आठवड्यात आम्ही सर्व उत्तर प्रदेशमधील प्रचारात सहभागी होऊ.
उत्तर प्रदेशमधील परिस्थिती खूप बदलली आहे, असं देखील शरद पवार यांनी सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Sharad Pawar | NCP Chief sharad pawar announce list of 3 states in which ncp going to contest assembly election

हे देखील वाचा :

Riteish Deshmukh | लातूरच्या बाभळगावमधील रितेशचा खास मित्र; भावनिक पोस्ट करत रितेश म्हणाला…

Ration Card | रेशन कार्डमध्ये जोडू शकता नवीन नाव, ‘ही’ आहे सर्वात सोपी पद्धत

Ram Kadam | ‘शरद पवार संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात ?’

Related Posts