IMPIMP

Sharad Pawar | शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात शरद पवारांचे महत्त्वाचं विधान, म्हणाले…

by nagesh
Sharad Pawar | ncp sharad pawar speech about Old Pension Scheme and others demands of teachers in prathmik shikshak sangh karnala panvel

पनवेल : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची (Maharashtra State Primary Teachers Association) शिक्षण परिषद (Education Council) व वार्षिक अधिवेशन (Annual Convention) आज (रविवार) पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लब (Karnala Sports Club Panvel) मध्ये पार पडले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, सध्या राज्यात फिरत असताना मला सातत्यानं एक निवेदन मिळत असतं की जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करा. आम्ही संसदेचं अधिवेशन (Parliament Session) संपलं की मुंबईत ग्रामविकास खात्याचे मंत्री (Minister of Rural Development), शिक्षणमंत्री (Minister of Education) यांच्यासोबत मी स्वत: एक बैठक घेतो आणि जुनी पेन्शन बाबत काय करता येईल याबाबत चर्चा करतो, असं आश्वासन त्यांनी दिलं. आपण वेगवेगळे मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करु असंही पवार म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पवार म्हणाले, राज्याचं चित्र नव्या पिढीच्या माध्यमातून आपण बदलू शकतो.
यासाठी त्यांना आनंददायी शिक्षण मिळायला हवं. ते काम तुम्ही करत आहात.
हसन मुश्रीफ यांनी ज्या काही घोषणा केल्या, त्याचं स्वागत मात्र ज्या राहिल्या आहेत त्याबाबत एकटे हसन मुश्रीफ निर्णय घेऊ शकत नाहीत.
त्यासाठी मंत्रिमंडळाची (Cabinet) परवानगी लागते.
मागील दोन वर्षात संकटावर संकटं येत आहेत. कोरोना (Corona), चक्रीवादळ (Cyclone) सारखी संकटं आली.
त्यामुळे मागील दोन वर्षात अधिवेशन देखील होऊ शकले नाही.
वारंवार संकटे येत असल्यामुळे काही मागण्या मान्य होऊ शकल्या नाहीत कारण आर्थिक स्थिती बिकट आहे,
असेही शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil), मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) उपस्थित होते.
धुलीवंदनाच्या दिवशी देखिल राज्यभरातून हजारो शिक्षक या परिषदेसाठी हजर झाले होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sharad Pawar | ncp sharad pawar speech about Old Pension Scheme and others demands of teachers in prathmik shikshak sangh karnala panvel

हे देखील वाचा :

Reduce Risk Of Heart Attack | ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करतील ‘ही’ 5 फळे, उन्हाळ्यात डाएटमध्ये करा समावेश

Nawab Malik | नवाब मलिक झाले ‘बिनखात्याचे मंत्री’ ! मलिकांकडे असलेल्या खात्यांचा आणि इतर पदभार ‘या’ 6 दिग्गजांकडे सुपूर्द

Time Deposit Account | बँकेच्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये बंपर व्याज; जाणून घ्या

Related Posts