IMPIMP

Sharad Pawar On Bogus Voting | शरद पवारांचा खळबळजनक आरोप, बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, कारवाईची मागणी

by sachinsitapure

बीड : Sharad Pawar On Bogus Voting | आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी खळबळजनक आरोप केला आहे. बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी पवार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, बीड (Beed Lok Sabha), पुणे (Pune Lok Sabha), बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha) सोडले तर बाकी ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. महाराष्ट्रात यावर्षी मोठया प्रमाणात पैशांचा वापर झाला. बारामती लोकसभा मतदारसंघात रात्री दोन वाजता एक बँक उघडी होती. तिथून पैसे वाटप होत होते. असे कधी झाले नाही पण यावर्षी काही ठिकाणी अशा गोष्टी पहायला मिळाल्या.

पवार म्हणाले, बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान झाले आहे. बीडमध्ये बूथ कॅप्चरचा प्रकार झाला. बोगस मतदान करणे, लोकांना मतदान करू न देणे असे प्रकार घडले. पुणे जिल्ह्यातही हे प्रकार झाले. संबंधीतांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

शरद पवार म्हणाले, निवडणूक आयोगाच्या काही निर्णयामुळे अडचण होत आहे. आमचा पक्ष काढून घेतला, चिन्ह काढून घेतले आणि त्यामुळे कोर्टात जावे लागले. मात्र यंदाच्या निवडणुकीत सामंजस्याची भूमिका घेत निवडणूक लढवली. आम्ही ४८ पैकी १० जागा लढवत आहोत. आमच्या या भूमिकेमुळे आम्हाला फायदा होताना दिसत आहे.

Shantigiri Maharaj | EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागवली माहिती

Related Posts