IMPIMP

Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | राज्यपालांनी सर्व मर्यादा सोडल्या ! ‘अशा व्यक्तीने राज्यपालासारख्या पदावर असू नये’ – शरद पवार

by nagesh
Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | ncp chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | भगतसिंग कोश्यारी यांना राष्ट्रपती आणि
पंतप्रधानांनी निकालात काढावे, अशा व्यक्तीला राज्यपाल पदासारख्या जवाबदाऱ्या देऊ नयेत. अशी परखड शब्दांत टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद
पवार यांनी केली आहे. (Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari)

भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांना जुने आदर्श म्हणत बाबासाहेब आंबेडकर किंवा नितीन गडकरींसारख्या नवीन व्यक्तींचा आदर्श घ्यायला हवा, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण भलतेच तापले होते. भाजप सोडता समाजातील सर्व स्तराकडून त्यांनी केलेल्या वक्तव्याची टीका झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांविरोधात वक्तव्य केले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाबद्दल शरद पवारांनी कठोर शब्दात टीका केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मुंबईत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, ‘राज्यपाल ही एक संस्था आहे.
त्या पदाबरोबर काही मर्यादा आणि बंधने येत असतात.
पण महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाने त्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
जरी त्यांनी त्यांच्या त्या विधानानंतर महाराजांबद्दल चांगले बोलणारे विधान केले असले,
तरी ते उशिरा आलेले शहाणपण आहे. त्यामुळे या राज्यपालांचा विषय राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी निकाली काढावा.
अशा व्यक्तीने राज्यपालासारख्या पदावर असू नये.’ असे स्पष्ट मत पवार यांनी व्यक्त केले आहे.

Web Title :- Sharad Pawar On Governor Bhagat Singh Koshyari | ncp chief sharad pawar slams governor bhagat singh koshyari for comment on chhatrapati shivaji maharaj

हे देखील वाचा :

Supriya Sule On CM Eknath Shinde | ‘डॉ. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य पणाला लावले, त्यामुळे महत्वाच्या पदावर असणाऱ्यांनी श्रद्धा ठेवली पाहिजे, अंधश्रद्धा नाही’

Gulabrao Patil On Aditya Thackeray | ‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरले असते तर त्यांना बिहारमध्ये जाण्याची वेळ आली नसती’

Ajit Pawar On CM Eknath Shinde | ‘मुख्यमंत्री ज्योतिषाकडे भविष्य बघून अंधश्रद्धांना खतपाणी घालत आहेत’; अजित पवारांचा आरोप

Related Posts