IMPIMP

Sharad Pawar On Sanjay Raut | मतदारसंघात परस्पर उमेदवार जाहीर केल्याने शरद पवारांनी संजय राऊतांना खडसावले; म्हणाले – “उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार…”

मुंबई: Sharad Pawar On Sanjay Raut | आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी सुरु आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून (Shrigonda Assembly Constituency) राष्ट्रवादी शरद पवारांच्या उमेदवाराचा चेहरा समोर आला आहे. असे असताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघामधील उमेदवारावरून शरद पवार आणि शिवसेनेचे नेते (Shivsena UBT Leader) संजय राऊत यांच्यात मतभेद उफाळून आले आहेत. तसेच परस्पर उमेदवार जाहीर केल्याने शरद पवार यांनी संजय राऊत यांना खडेबोल सुनावले आहेत.

नगरमधील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करत संजय राऊत यांनी येथून पुढचा आमदार हा ठाकरे गटाचाच असेल, असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “शिवसेनेचे एक नेते काल तुमच्या तालुक्यात आले होते. तसेच त्यांनी हे आमचे उमेदवार आहेत, असे जाहीर करून टाकले. अशाप्रकारे उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार कुणालाही नाही”, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान पवारांनी कानउघाडणी केल्यानंतर राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्त्न केला. “शरद पवार यांच्याकडे श्रीगोंदा बाबत चुकीची माहिती आहे. प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांना काम करण्यासाठी संदेश देत असतो”, असा दावा राऊतांनी केला आहे.