IMPIMP

Sharad Pawar | 3 कृषी कायदे रद्द केल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘उशिरा का होईना, शहाणपण आलं’

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar hits out modi government after three farm laws repealed pm narendra modi

चंद्रपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Sharad Pawar | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज जनतेला संबोधित करीत तिन्ही कृषी कायदे (3 Agricultural laws) रद्द करण्याची मोठी घोषणा केली. यावरुन भारतातून विविध प्रतिक्रिया येवु लागल्या. यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांनीही या घोषणेवरुन प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवारांनी मोदी सरकारवर (Modi government) ताशेरे ओढले आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यावेळी बोलताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, ‘कृषी कायदे करताना राज्य सरकारांना विश्वासात घेण्यात आलं नाही. संसदेत गोंधळात तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले. त्या कायद्यांना शेतकऱ्यांना तीव्र विरोध केला. अखेर सरकारला उशिरा का होईना, शहाणपण आलं, असा निशाणा शरद पवारांनी केंद्रातील मोदी सरकारवर साधला आहे. तर, मोदी सरकारने (Modi government) आणलेले 3 कायदे कृषी अर्थव्यवस्थेला अडचणीत आणणारे होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी त्यांना विरोध केला, असं पवार म्हणाले.

पुढे पवार म्हणाले, ‘संसदेत गोंधळ सुरू असताना विधेयकं मंजूर करून घेण्यात आली. पण आता पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका जवळ आल्या आहेत. तिथल्या लोकांचा रोष स्थानिक भाजप नेत्यांनी पाहिला. त्यामुळेच कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय झाला,’ असं पवार म्हणाले. तसेच, हजारो शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. थंडी, वारा, ऊन, पावसाची तमा न बाळगता शांततेच्या मार्गानं त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अखेर सरकारला घ्यावी लागली. या शेतकऱ्यांच्या लढ्याला, त्यांच्या संघर्षाला मी सलाम करतो. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Sharad Pawar | sharad pawar hits out modi government after three farm laws repealed pm narendra modi

हे देखील वाचा :

Sonam Kapoor | सोनम कपूरच्या गळ्यातील काट्यांचा हार; पाहून व्हाल चकीत

Multibagger Stock | 20 रुपयावरून 9,985 वर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदारांचे 20 हजार झाले 1 कोटी रुपये; तुमच्याकडे आहे का?

Life Insurance Premiums | पुढील वर्षापासून महाग होणार लाईफ इन्श्युरन्स पॉलिसी, जाणून घ्या किती वाढणार प्रीमियम?

Related Posts