IMPIMP

Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar replies devendra fadnavis who criticise maha vikas aghadi government over maval incident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  उत्तर प्रदेशातील लखीमपूर (Lakhimpur) येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद (Maharashtra Band) पुकराला होता. यावरुन भाजपने मावळ येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा (maval incident) दाखला देत जोरदार टीका केली होती. या टीकेवरुन राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार पलटवार केला आहे. मावळ घटनेला भाजप (BJP) जबाबदार असल्याचे लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार 90 हजार मतांनी विजयी झाला, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मावळातील जनतेला भाजपची भूमिका समजली

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, मावळमध्ये जे घडलं त्याला राजकीय नेते जबाबदार नव्हते.
मावळमधील घटनेमध्ये पोलिसांवर (Police) आरोप होता. मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावले.
मावळच्या लोकांना भडकवायला कुणी प्रयत्न केला हे लक्षात आल्यावर आता मावळमधील नागरिकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 90 हजार मतांनी विजयी केलं.
मावळच्या जनतेला भाजपची भूमिका कळल्यामुळेच तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला असंही शरद पवार यांनी म्हटलं.

https://fb.watch/8CAnlU1rJX/

पवारांचा फडणवीसांना चिमटा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय या वक्तव्यावर शरद पवारांनी भाष्य करत फडणवीस यांना चिमटा काढला.
ते म्हणाले, काही आरोप झाल्यावर त्याचं स्पष्टीकरण भाजप द्यायला येतं. याचं मला नवल वाटतं. ईडी (ED), आयटी (IT), एनसीबी (NCB) सर्वांचाच गैरवापर होतोय.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, या केंद्रीय तपास यंत्रणांचा मला अभिमान आहे.
कालच्या भाषणात ते म्हणाले की मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो पण ते लक्षात राहत नाही.
त्यांना मुख्यमंत्री असल्यासारख वाटतं मी त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत त्यांनी फडणवीसांना चिमटा काढला.

मागच्या 6 दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे

शरद पवार म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांचं भाष्य मी ऐकलं. ते बोलले की मी अर्थमंत्री आहे.
कर चोरी आम्ही करत नाही. कारण मंत्री म्हणून मला याबाबत माहिती आहे. मागच्या सहा दिवसांपासून आमच्या घरी पाहुणे आले आहेत.
पाहुणचार किती घ्यावा याला देखील लिमिट असते. पाहुणचार घ्यावा परंतु अजीर्ण होईल इतका घेऊ नये. अजूनही काही ठिकाणी ते अधिकारी आहेत.
मी आमच्या घरी चौकशी केली त्यावेळी एक लक्षात आलं की एका घरामध्ये 18 अधिकारी आले होते.
आमच्या घरातील दोघे जण होते परंतु त्यांच्या घरी 18 जण येऊन थांबले होते.
आता ही छोटी घरं आहेत यामध्ये कसं एॅडजस्ट करायचं हे त्यांना कळायला हवं होतं, असा टोला शरद पवारांनी लगावला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

देशमुखांवर आरोप करणारे अधिकारी कुठे आहेत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर माजी पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) आरोप केले त्यातून देशमुख यांनी राजीनामा दिला होता.
मात्र, ज्यांनी ते आरोप केले ते अधिकारी कुठे आहेत याचा पत्ता लागत नाही. जबाबदार अधिकारी जबाबदार मंत्र्यांबाबत असे आरोप करतो असं चित्र यापूर्वी कधीही घडलं नव्हतं,
असं शरद पवार म्हणाले. देशमुख यांच्या घरी आता पाचव्यांदा छापा टाकण्यात आला असून पाच वेळा छापा हा सीबीआयचा (CBI) विक्रम असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Web Title : Sharad Pawar | sharad pawar replies devendra fadnavis who criticise maha vikas aghadi government over maval incident

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune News | पुणेकरांची चिंता वाढली ! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल, म्हणाल्या – ‘प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?’

Related Posts