IMPIMP

Shashikant Shinde | ‘…म्हणूनच भाजपने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल, ते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत’, शशिकांत शिदेंनी सांगितलं ‘प्लॅनिंग’

by nagesh
Shashikant Shinde | devendra fadnavis wants to become maharashtra cm after eknath shinde and 16 others shiv sena mlas disqualify shocking revelation by ncp shashikant shinde

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करुन भाजपच्या (BJP) पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री (CM) म्हणून एकनाथ शिंदे असतील असे जाहीर करुन सर्वांना धक्का दिला. भाजपकडे 100 पेक्षा जास्त जागा असताना देखील भाजपने मुख्यमंत्रीपद घेतले नाही. भाजपचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्यात आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते (NCP) शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी भाजपच्या राजकीय खेळीवर भाष्य केलं आहे. भाजप ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असल्याचा दावा शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भाजपकडून आत्ताच्या घडीला म्हणूनच मुख्यमंत्री पद घेतलं गेलं नसेल. कारण अपात्र ठरले तर मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी अपात्र ठरतील. मग परत भाजप मुख्यमंत्रिपदावर दावा करु शकतो, अशा प्रकारची रणनीती भाजपची असू शकते. या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग भाजपच्या तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून चालेलं असल्यामुळे या बाबतीत (मंत्रिमंडळ) निर्णय घेतलेला नाही. सरकार बनवलं आणि लगेच जर कोर्टात निर्णय विरोधात गेला तर नामुष्की होऊ शकते. त्याचा तोटा भाजपला होऊ शकतो म्हणून ते ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत असल्याचा दावा शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला आहे.

शिंदे (Shinde Group) आणि ठाकरे गटाकडून (Thackeray Group) वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल करण्यात आल्या आहेत.
16 आमदारांच्या अपात्र पासून सर्वच प्रकारच्या याचिकांवर सुनावणी सोमवारी (दि. 8) होणार आहे.
त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) पुन्हा लांबणीवर पडल्याचे सांगितले जात आहे.
मात्र फडणवीस यांच्या दिल्ली बैठकीत भाजपची मंत्रिमंडळातील नावे अंतिम झाल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे शिंदे गटाकडून अधिकची मंत्रिपदे आणि विशिष्ट खात्यांचा आग्रह धरला जात असल्याची माहिती आहे.
अशा परिस्थितीत नक्की कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Web Title :-  Shashikant Shinde | devendra fadnavis wants to become maharashtra cm after eknath shinde and 16 others shiv sena mlas disqualify shocking revelation by ncp shashikant shinde

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या विरोधात कोण बोलतो’ असे म्हणत टोळक्याचा राडा, कोयत्याने तरुणावर वार

Ajit Pawar | मंत्रिमंडळ स्थापनेसाठी कोणाला घाबरताय, अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला

Pune Crime | बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts