IMPIMP

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचे आणखी एक अपयश, अजून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून गेला?

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

सरकारसत्ता ऑनलाईन : वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) आणि टाटा-एअरबस (Tata-Airbus) सारखे मोठे प्रकल्प गुजरातला (Gujrat) गेल्यानंतर आधीच अडचणीत असलेले शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) अजून अडचणीत आले आहे. केंद्राकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळविण्याच्या आठ राज्यांच्या स्पर्धेत महाराष्ट्र (Shinde-Fadnavis Government) मागे पडला आहे. ऊर्जा उपकरण निर्मिती झोन मिळवण्यात मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) औद्योगिक विकास महामंडळाने बाजी मारली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऊर्जा उपकरण निर्मिती झोन (Manufacturing Zone for Power and Renewable Energy Equipment) मिळवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) (MIDC) प्रयत्नशील होती. या प्रकल्पासाठी महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू आणि तेलंगणा अशी एकूण आठ राज्ये प्रयत्नशील होती. महाराष्ट्राकडून एमआयडीसीने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता. (Shinde-Fadnavis Government)

या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने या आठ राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांचे एका एजन्सीमार्फत मूल्यमापन केले. त्या मूल्यमापनात मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रस्तावाला सर्वांत जास्त गुण मिळाले. एजन्सीच्या शिफारशीनुसार मध्य प्रदेशच्या या प्रस्तावाला २२ ऑक्टोबर २०२२ रोजी केंद्र सरकारच्या प्रकल्प सुकाणू समितीने मंजुरी दिली आणि २ नोव्हेंबर २०२२ रोजी या प्रकल्पाबाबत मध्य प्रदेशच्या मुख्य सचिवांना केंद्र सरकारने प्रकल्प मंजुरीचे पत्र दिले.

यापूर्वीच्या महाराष्ट्राच्या हातून गेलेल्या बल्क ड्रग पार्कसाठी १ हजार कोटी, तर मेडिकल डिव्हाईस पार्कसाठी
४०० कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. मात्र, महाराष्ट्राच्या हातात यातील एकही प्रकल्प लागला नाही.
बल्क ड्रग पार्क गेल्यानंतरही विरोधकांनी सरकारवर (Eknath Shinde Government) ताशेरे ओढले होते.
या ऊर्जा उपकरणनिर्मिती झोनसाठी केंद्र सरकार ४०० कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

हे देखील वाचा :

Jayant Patil On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस सहमत’ – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

Uday Samant | ‘महाराष्ट्रातील उद्योजकांना विकास करण्यासाठी ताकदीचा मुख्यमंत्री मिळावा म्हणून आम्ही राजकीय पाऊल उचलले; कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही’

Chandrakant Khaire | किर्तिकरांना म्हातारचळ लागलय, चंद्रकांत खैरेंचा शेलक्या शब्दात हल्लाबोल

NCP Umesh Patil On Rajan Patil | ‘राजन पाटील यांच्यामुळे मला पाटील म्हणवून घेण्यासाठी सुद्धा लाज वाटते’ – उमेश पाटील

Related Posts