IMPIMP

‘हे’ महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे, शिवसेनेची टीका

by sikandershaikh
shiv sena slam bjp and governor through saamana editorial over puducherry government issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)पुदुच्चेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटापटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रात झाले. पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी सरकारला धड काम करू दिलं नाही. दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असं वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत किंवा पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात असं म्हणत शिवसेने (Shiv Sena) नं घणाघाती टीका केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी असा आरोप केला होता की, पुदुच्चेरीत काँग्रेस सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रातही ठाकरे सरकार (Uddhav Thackeray Government) अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुदुच्चेरीच्या राजकीय घडामोडींवरून शिवसेनेनं (Shiv Sena) सामनाच्या अग्रलेखातून भाजप (Bharatiya Janata Party- BJP) आणि राज्यपालांवर जोरदार टीका केली आहे.

सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय लिहिलंय ?

सामनाच्या अग्रलेखात लिहिलंय की, पुदुच्चेरी हे राज्य केंद्रशासित असल्यानं तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात.
त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी (Kiran Bedi) फिरवू लागल्या.
अर्थातच दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असं वागणार नाहीत.
राज्यपाल महाराष्ट्राचे असोत किंवा पुदुच्चेरीचे त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात.
राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो.
किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणं वापरून फेकून दिलं आहे हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या
भाज्यपालांनी समजून घेतलं पाहिजे असं म्हणत शिवसेनेनं राज्यपालांवर बोचरी टीका केली आहे.

अग्रलेखात पुढं लहिलंय की, पुदुच्चेरीमधील सरकार पाडलं. आता मार्च एप्रिलमध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करणार असल्याचं भाजप पुढाऱ्यांनी जाहीर केलं आहे.
मध्य प्रदेशातील सरकार पाडल्यानंतरही पुढचा घाव महाराष्ट्रावर असं जाहीरच केलं होतं.
त्यानंतर बिहारचे निकाल एकदा लागू द्या, मग पहा महाराष्ट्रात कसं परिवर्तन घडवून दाखवतो वगैरे बतावण्या सुरू झाल्या.
आता बात पुदुच्चेरीची सुरू आहे.
परंतु जशी दिल्ली बहुत दूर है, त्याप्रमाणे महाराष्ट्र तो बहुतही दूर है असं चित्र आहे असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वरिष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा ‘आहेर’, म्हणाले- ‘सत्तेसाठी भाजप कोणतीही तडजोड करतोय’

Related Posts