IMPIMP

Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मुंबई-पुणे महामार्गावरील खोपीलीजवळील दुर्घटना

by nagesh
Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  Shivsangram Vinayak Mete | शिवसंग्राम पक्षाचे माजी आमदार विनायक मेटे यांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुखापत इतकी गंभीर होती की त्यांना वाचवता आले नाही. शिवसंग्राम पक्ष हा महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष आहे. (Shivsangram Vinayak Mete)

मुंबईपासून 70 किमी अंतरावर खोपोली शहराजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाच वाजता भाताण बोगद्याजवळ शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Shivsangram Vinayak Mete) यांची कार रस्त्याच्या बाजूच्या डोंगराच्या दगडावर आदळून हा अपघात झाला. मेटे यांचा अंगरक्षक आणि चालकाची प्रकृतीही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Vinayak Mete Accident News)

असा झाला अपघात

विनायक मेटे हे त्यांच्या कारने बीडहून मुंबईला जात होते. खोपोलीजवळ त्यांच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कार समोरून जाणार्‍या दुसर्‍या कारला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, मेटे यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मराठा समाजातील लोकप्रिय नेते

मेटे यांची 2016 मध्ये भाजपच्या कोट्यातून आमदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मात्र त्यांच्या पक्षाला एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या नव्या युती सरकारमध्ये संधी मिळाली नाही. महाराष्ट्र विधानसभेत मेटे यांचा पक्ष फार मोठा नसला तरी मराठवाड्यातील काही भागात तो लोकप्रिय आहे.

Web Title :- Shivsangram Vinayak Mete | shiv sangram party leader vinayak mete died in road accident

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Related Posts