IMPIMP

Shivsena | महाराष्ट्रातील राजकीय कटुता मान्य करणार्‍या फडणवीसांना शिवसेनेचे आवाहन, कटुता संपवाच, लागा कामाला

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis react uddhav thackeray challenge get election loksabha vidhansabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उघडपणे कबूल केले. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील वक्तव्य केले होते. यावरुन, आता शिवसेनेने (Shivsena) अग्रलेखाच्या माध्यमातून फडणवीसांना कटुता संपवण्यासाठी साद घातली आहे. फडणवीस यांनी मांडलेल्या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर महाराष्ट्राने विचार करायला हवा, असेही शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेना राहता कामा नये व शिवसेनेतून जे विष बाहेर पडलेय त्या विषाला ’बासुंदी’चा दर्जा देण्याचा सध्या जो अचाट प्रयत्न सुरू आहे त्यामुळे कटुतेची धार कशी कमी होणार? शिवसेनेतले काही लोक लाचार किंवा मिंधे केल्याने सत्ता मिळाली; पण महाराष्ट्राचे राजकीय वातावरण साफ नसल्याची जाणीव श्री. फडणवीस यांना झाली हे काय कमी झाले? असो.

शिवसेनेने (Shivsena) फडणवीसांना आवाहन करताना म्हटले आहे की, उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. नेपोलियन, सिकंदरही कायम राहिले नाहीत. राम-कृष्णही आले आणि गेले. तेथे आपण कोण? फडणवीस, तुमच्या मनात आलेच आहे तर कटुता संपविण्याचा विडा उचलाच! लागा कामाला!!

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या (BJP) अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल. फडणवीस यांनी त्यांच्या मनातील वेदना उघड केली आहे. ते पुढे सांगतात, महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता आता राजकीय वैमनस्यापर्यंत गेली आहे. महाराष्ट्राची अशी राजकीय संस्कृती नाही. राजकीय मतभेद असले तरी सर्व पक्षांचे नेते एकमेकांशी बोलू शकतात. त्यामुळे ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. श्री. फडणवीस यांनी हे सांगावे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर आज देशाच्या राजकारणातच कटुता आली आहे. लोकशाहीचे संकेत काय आहेत? सत्ताधारी पक्ष कोणताही असो, त्याने विरोधी पक्षीय हे एकजात देशाचे शत्रू असल्याचे मानू नये. लोकशाहीत मतभिन्नतेला वाव असल्याने, भिन्न मत म्हणजे देशविरोधी मत असे ठरत नाही. म्हणून सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी एकमेकांच्या किमान प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून काम केले पाहिजे. पण, आज हे वातावरण महाराष्ट्रात व देशातही राहिलेले नाही.

सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे.
यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan), शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे
(Shivsena chief Balasaheb Thackeray), शरद पवार (Sharad Pawar) अशा नेत्यांनी हे बेरजेचे
राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले
जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणार्‍या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले आहे. ते शरद पवारांपासून,
ठाकर्‍यांपर्यंत ज्या भाषेचा वापर करतात त्यामुळे राज्याच्या राजकारणातील कटुता कशी कमी होईल?
तुम्ही केंद्रीय सत्तेचा गैरवापर करून सरकार पाडले. शिवसेना फोडलीत. शिवसेनेचे (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह
गोठवले जावे यासाठी पडद्यामागून राजकीय सूत्रे हलवली गेली, हे सर्व महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले,
असे शिवसेनेने म्हटले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shivsena | as soon as devendra fadnavis ends his bitterness shivsena uddhav thackeray also applauded bjp

हे देखील वाचा :

Chhagan Bhujbal | सर्व प्रकल्प गुजरातला गेले आहेत, आता महाराष्ट्रातल्या तरुणांनी आरत्या आणि हनुमान चालिसा पठन करा – छगन भुजबळ

Akshay Kumar | अक्षक कुमारचा ‘रामसेतू’ बुडाला

Maharashtra Politics | डोंबिवलीच्या मध्यवर्ती शाखेत शिंदे आणि ठाकरे दोघांचेही फोटो

Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधाच्या संशयावरून बायकोच्या मित्राचा भोसकून खून

Related Posts