IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिरुरमध्ये काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंचा आढळराव पाटलांना टोला

by nagesh
 Shivsena | shivsena slams in saamana editorial bjp govt over miss management in pune after heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन   राज्यात सत्तांतर झाल्यानंतर ‘खरी शिवसेना कोणाची’ यावरुन शिंदे गट (Shinde Group) आणि उद्धव ठाकरे गट (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. सध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) असून, पक्ष चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) सोपवण्यात आला आहे. न्यायालयातील प्रलंबित खटल्याचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगापुढील सुनावणी स्थगित करावी, अशी विनंती शिवसेनेने केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांना धक्का दिला. न्यायालयाच्या या निर्णयावर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी मातोश्री (Matoshree) निवासस्थानाबाहेर पुणे (Pune), यवतमाळच्या (Yavatmal) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दसरा मेळावा (Dasara Melava 2022), निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी शिरुर (Shirur) मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे यांनी शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Former MP Shivajirao Adharao Patil) यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ‘ढळली’, पण जे खरे ‘अढळ’ आहेत ते माझ्यासोबत आहेत. असा टोला त्यांनी आढळराव पाटलांना लगावला. तसेच ज्या मतदारसंघात शिवनेरी (Shivneri Fort) आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवसेनेरीचा अपमान असल्याचे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले.

यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. मी एक गोष्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की,
देवाने ही आपल्याला दिलेली संधी आहे. आपल्यावर हिंदुत्व (Hindutva) आणि लोकशाही (Democracy)
टिकवण्याची आणि वाढवण्याची जबाबदारी आहे. मध्यंतरी हिंदुत्त्वाच्या खोटेगिरीचा जो कळस गाठला गेला,
ते म्हणजे इतिहासाथील तोतयाच्या बंडासारखा प्रकार होता, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आता ठाकरे यांच्या टीकेला शिंदे गटाकडून कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार हे पहावे लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात.
शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध रहा,
असा सल्ला ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला.
तसेच आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो किंवा निवडणूक आयोगातील असो.
पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे.
लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title :- Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray on shinde faction election commission

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

Pune Crime | सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला करणाऱ्या नोन्या वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 97 वी कारवाई

Pune Crime | भारती विद्यापीठ परिसरात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Related Posts