IMPIMP

Deepak Kesarkar On Uddhav Thackeray | ‘शिवसेनेचे अनेक खासदार नाराज ! उद्धव ठाकरे यांनी एनडीएसोबत यावं’ – दीपक केसरकर

by nagesh
Deepak Kesarkar | The decision to close 'those' schools has not been taken at the government level - Deepak Kesarkar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Deepak Kesarkar On Uddhav Thackeray | आज गुरुपौर्णिमा आहे. माझे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत. हिंदुत्वाचा विचार घेऊन चालणे, हीच त्यांना गुरुदक्षिणा असेल, असं म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एनडीएसोबत (NDA) येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, शिवसेनेचे 80 टक्के खासदार नाराज असल्याचेही केसरकर यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दीपक केसरकर हे एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आले आहेत. त्यावेळी केसरकर म्हणाले की, “आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत. तसेच, उद्धव ठाकरे यांना मी विनंती करतो की एनडीएमध्ये यावे. 80 टक्के खासदार नाराज आहेत. खासदार हिंदुत्वाचा मार्ग सोडणार नाहीत. शिवसेनेच्या बैठकीत नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे. त्यामुळे त्यांनी एनडीएसोबत आले पाहिजे.”

पुढे केसरकर म्हणाले, “राऊत हे शरीराने शिवसेनेत पण मनाने राष्ट्रवादीत आहेत.
पवारसाहेब म्हणतात दोन पण आमदार निवडून येणार नाही.
पण त्यांनी भूतकाळात रमून चालणार नाही,” असं त्यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, “आम्ही एका विचाराने पुढे जात आहोत.
हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात आहोत. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत.” असं ते म्हणाले.

Web Title :- shivsena chief uddhav thackeray should come with nda 80 percent shiv sena mps are angry say deepak kesarkar

हे देखील वाचा :

Ear Wax | पेन्सिल किंवा लोखंडाने कान स्वच्छ करणे धोक्याची घंटा, जाणून घ्या ईयर व्हॅक्स काढण्याची योग्य पद्धत

Pune Crime | नगरमध्ये खून करुन झाले होते फरार ! अपहरण करणार्‍या 5 जणांना भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

Black Pepper Benefits | तुम्हाला काळी मिरी जेवणात आवडते का? मग जाणून घ्या तिच्या रोजच्या सेवनाने काय होते

Related Posts