IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, या झाडाला नवे गुलाब येतील’, उद्धव ठाकरेंची गुलाबराव पाटलांवर टीका

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ज्यांना मोठे केले ते सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहेत. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता
काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. भाजपला (BJP) गुलाब दिसत होते त्यांना कळेल की माझ्याकडे झाड होते, त्याचे गुलाब तुम्ही नेले आता काटे
तुम्हाला बोचतील. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन या झाडाला नवे गुलाब येतील, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav
Thackeray) यांनी गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे नाव न घेता टीका केली. जळगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर जमा झाले होते.
त्यावेळी उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून रोज लढाया सुरु आहेत. आपली लढाई दोन तीन पातळीवर सुरु आहे. एक रस्त्यावरील लढाई आहे, त्यात आपण कमी पडणार नाही. दुसरी लढाई कोर्टात (Court) सुरु आहे. आणि तिसरी लढाई ही तेवढीच महत्त्वाची आहे. ती लढाई म्हणजे कागदाची. शपथपत्र गोळा करा. हा विषय खूप गंभीर आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कायद्याची लढाई सुरु आहे. ती लढाई आपले वकील किल्ला लढवत आहेत.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. आजपर्यंत शिवसेनेला फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले.
परंतु आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. हे मी आधीच बोललो होतो की, हा प्रयत्न शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न आहे.
परवा भाजप अध्यक्ष यांनी ते बोलून दाखवले. शिवसेना हा संपत चाललेला पक्ष आहे, असे ते म्हणतात.
पण त्यांना माहिती नाही की, शिवसेनेनं अशी आव्हानं पायदळी तुडवत त्यावर झेंडा रोवला आहे, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपला इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले, ठीक आहे राजकारणात हार जीत होत असते.
कधी कोण जिंकत असतं, तर कुणी पराभूत होत असतो. पण कुणी कुणाला संपवण्याची भाषा आपल्या देशात झाली नव्हती.
दुसऱ्याला संपवण्याची भाषा करतो तो संपतो, असा इशारा ठाकरे यांनी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : –  Shivsena Chief Uddhav Thackeray | uddhav thackeray slams shiv sena rebel gulabrao patil in matoshri mumbai meeting of jalgaon team

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही…’ शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा; सामंतांच्या कार हल्ल्यावरुन राजकारण तापलं !

Gopichand Padalkar | उदय सामंतांवर हल्ला करणारे शिवसैनिक नसून ती शरद पवारांची माणसं, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Maharashtra Political Crisis | पृथ्वीराज चव्हाण बोलले तेच न्यायालयात झालं, शिंदे गटाने ठाकरेंची तीच चूक दाखवली !

Related Posts