IMPIMP

Shivsena | मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ?, शिवसेनेच्या मुखपत्रातून मंत्रिमंडळावर टीकास्त्र

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shindes banners in aaditya thackerays worli constituency on occasion of navratri 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. तब्बल 40 दिवस रखडलेला मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 18 आमदारांनी (MLA) शपथ घेतली. या सरकारच्या मंत्रिमंडळात दोन चेहऱ्यांना संधी दिल्याने चांगलाच वाद सुरु झाला आहे. माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांना पुन्हा मंत्रिपदाची संधी दिल्याने महिला नेत्यांसह विरोधकांनीही राज्य सरकारवर (State Government) टिका केली आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे TET घोटाळ्यात (Maharashtra TET Scam) होती, तर ज्या भाजपने (BJP) राठोड यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले, त्याच संजय राठोड यांनी फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) मंत्रिमंडळात शपथ घेतली. आता, शिवसेनेनंही (Shivsena) या मंत्रिमंडळ विस्तारावर तिखट शब्दात टीका केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह नवीन मंत्रिमंडळावर शिवसेनेने (Shivsena) टीकास्त्र सोडले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत ? असा प्रश्न शिवसेनेच्या (Shivsena) मुखपत्रातून विचारण्यात आला आहे. दिल्लीच्या दरबारात मागील रांगेत गेलाच आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपल्या दालनात ‘लखोबा लोखंडे’ च्या (Lakoba Lokhande) तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता आता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांना लखलाभ ठरोत.

सरकार बाळंत झाल्याने पेढे वाटले, पण…

40 दिवसानंतर शिंदे-फडणवीसांचे सरकार (Shinde-Fadnavis Government) बाळंत झाल्याचे पेढे वाटण्यात आले, पण पाळण्यात नक्की काय आहे ? ते समजायला मार्ग नाही.
भाजप व शिंदे गट मिळून 18 मंत्र्यांना शपथ देण्यात आली.
मंत्र्यांना शपथ देताना राज्यपाल महोदयांचा चेहरा आनंदाने न्हाऊन निघाला होता.
फार मोठे ईश्वरी कार्य आपल्या हातून पार पडल्याच्या अविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता,
पण राज्यपाल महोदयांनी 40 दिवसांपूर्वी एका बेकायदा सरकारला शपथ दिली व आता त्याच सरकारच्या मंत्र्यांना शपथ देऊन घटनेचा अपमान केला.

महाराष्ट्राची मान शरमेने खाली

स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांची तरी काय प्रतिष्ठा राहिली आहे ?
महिनाभरात त्यांना दिल्लीत सात हेलपाटे मारावे लागले तेव्हा कोठे काल मंत्रीमंडळाचा विस्तार ते करु शकले.
शिंदे दिल्लीत निती आयोगाच्या (Niti Aayog) बैठकीत गेले.
बैठक संपल्यानतर ‘टीम इंडिया’ चा म्हणून पंतप्रधानांसोबत (PM) सामुहिक फोटो प्रसिद्ध झाला,
तो स्वाभिमानी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालवायला लावणारा आहे.
मोदींसोबतच्या छायाचित्रात शिंदे (Eknath Shinde) तिसऱ्या रांगेत उभे आहेत. हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रात ‘राष्ट्र’ आहे व त्या शिवरायांच्या राष्ट्रास दिल्लीने मागच्या रांगेत उभे करुन शिंदे यांना त्यांच्या मांडलिकत्वाची जाणीव करुन दिली.
अशा या मांडलिक राज्याचे मंत्रिमंडळ सत्तेवर असेल काय किंवा नसेल काय, राज्याला काय फरक पडणार ?
महाराष्ट्रास अर्धेमुर्धे मंत्रिमंडळ लाभले आहे इतकेच, पण ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते किती काळ गप्प बसतील, हाच खरा प्रश्न आहे !

Web Title : –  Shivsena | CM eknath shinde ministers should put photos of lakhoba lokhande in the hall shiv sena strongly criticizes the cabinet

हे देखील वाचा :

Pune Crime | परवान्यामध्ये खाडाखोड केल्याने चंदननगर परिसरातील गिरणी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Lords च्या मैदानात मुकेश अंबानी, सुंदर पिचाई आणि रवि शास्त्री दिसले सोबत, ‘हा’ प्लान तर नाही ना ?

NCP Chief Sharad Pawar | भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कसं संपवलं जातं, शरद पवारांनी मांडली ‘परफेक्ट’ थिअरी

Related Posts