IMPIMP

Shivsena Dasara Melava | छापा-काटा ! हिंमत असेल तर पाडून दाखवा; CM उद्धव ठाकरेंचे भाजपला ‘आव्हान’

by nagesh
Maharashtra Cabinet Reshuffle | maharashtra cabinet will be reshuffled soon two congress ministers will be replaced praniti shinde in race

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा (shivsena Dasara Melava) मुंबईतील षणमुखानंद हॉलमध्ये सुरु आहे. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तुमच्या आशिर्वादाने पुढील काही महिन्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) दोन वर्षे पर्ण करेल. सरकार पाडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. तसं करुन पडत नाही म्हणून छापा-काटा सुरु झाला. छापा टाकायचा आणि काटा काढायचा. ही थेरं जास्त काळ चालू शकणार नाहीत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात (shivsena Dasara Melava) बोलताना भाजपवर केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

उद्धव ठाकरे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव सुरु आहे. लाल बाल आणि पाल, महाराष्ट्र (Maharashtra), बंगाल (Bengal), पंजाब (Punjab) स्वातंत्र्य लढात पुढे होता.
बंगाली जनतेने धडा शिकवला आहे त्या बंगाली जनतेचे आणि ममता दिदींचे (Mamta Didi) अभिनंदन करतो.
न झुकण्याची जिद्द आपल्या रगारगात कायम ठेवावी लागेल. हर हर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये पण आली तर दाखवावीच लागेल.
इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

या देशात हिंदुत्व धोक्यात आहे का ? गृह मंत्रालयाने हिंदुत्वाला धोका नाही असे सांगितलेय. याच दिवसाची या क्षणाची वाट पाहत होतो.
हिंदुत्व आता धोक्यात आले आहे. नवहिंदू उपटसुंभ यांच्यापासून हिंदुत्वाला धोका असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Web Title : Shivsena Dasara Melava | shivsena dasara melava 2021 uddhav thackerays challenge bjp mahavikas aghadi government

हे देखील वाचा :

Shiv Sena Dussehra Melawa | ‘…कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला झालो असतो’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (व्हिडीओ)

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘मीच मुख्यमंत्री आहे असं वाटत नाही, कारण…’ (व्हिडीओ)

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,898 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts