IMPIMP

ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali | मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीचे समन्स; पुढील आठवड्यात चौकशी

by nagesh
Shivsena MP bhavana gawali again ordered to appear for questioning next week in Money Laundering Case ED Summons

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali | महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी (Money Laundering Case) शिवसेनेच्या (Shivsena) खासदार भावना गवळी यांना ईडीने समन्स (ED Summons) बजावले आहे. या समन्समध्ये पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या पूर्वीही ईडीने (ED) भावना गवळी (Bhavana Gawali) यांना समन्स बजावले होते. मात्र वेगवेगळ्या कारणांनी त्या उपस्थित राहिल्या नाहीत. परंतु त्यांना आता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. तसे न झाल्यास ईडी त्यांना अजामीनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. (ED Summons To Shivsena MP Bhavana Gawali)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

भावना गवळी यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला होता. गवळींनी भारत सरकारच्या बँकेकडून आपल्या बालाजी आर्टिकल फोर्ट (Balaji Article Fort) कारखाण्यासाठी ४४ कोटींचे कर्ज घेतले होते. तर ११ कोटी कर्ज स्टेट बँकेकडून घेतले. दरम्यान, हा ५५ कोटींचा कारखाना केवळ २५ लाख रुपयांना आपल्याच भावना अँग्रो प्रायव्हेट कंपनीला (Bhavna Agro Private Company) विकला. त्यानंतर या नवीन कंपनीसाठी आणखी ११ कोटी रुपयांचा कर्ज घेतले. अशा प्रकारे भावना गवळी यांनी १०० कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोपही सोमय्या यांनी केला होता.

काय आहे प्रकरण ?

भावना गवळी यांचे वडील पुंडलीकराव गवळी (Pundalikrao Gawli) यांनी १९९२ मध्ये बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची (Balaji Particle Board Factory) स्थापना केली होती. राज्य सरकारच्या (Maharastra Government) हमीपत्रावर राष्ट्रीय सहकार निगमकडून ४३ कोटीचे कर्ज मिळविले. २००२मध्ये गवळी यांनी या कारखान्याची १४ हेक्टर जमीन बेकायदा पद्धतीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठानला विकली. यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार हरीश सारडा यांनी ईडीला दिली होती. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.

Web Title :  Shivsena MP bhavana gawali again ordered to appear for questioning next week in Money Laundering Case ED Summons

हे देखील वाचा :

Pune Fire | आगीत सापडलेले सोन्याचे दागिने अग्निशामक दलाने केले परत; लक्ष्मी रोडवरील सराफाच्या कार्यालयात लागली होती आग

Pune PMC Anti-Encroachment Campaign | महापालिकेकडून पंचनामे केले जात नसल्याने संघटना आक्रमक; कायद्यातील तरतुदी तपासून पंचनाम्याबाबत निर्णय घेण्याची मनपा प्रशासनाची तयारी

Fuel Price Hike Impact On Milk Delivery | इंधन दरवाढीची झळ दूध वितरकांनाही ! कमिशन वाढवून मिळावे यासाठी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील ‘गोकुळ’ दूध वितरकांचा दूध न उचलण्याचा इशारा

Related Posts