IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच जिंकणार’; संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा

by nagesh
MP Sanjay Raut | nashik graduate constituency elections disturbance was observed regarding the candidate of mahavikas aghadi sanjay rauton on gujarat himachal election result

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena MP Sanjay Raut | राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे
गटातील आमदारांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) मोठा धक्का बसला
आहे. त्यामुळे बंडखोर आमदार आणि शिवसेना असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. या दरम्यान आता वेळ निघून गेलीय. सामना करायचा
असेल तर मुंबईत या, असं आव्हान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी केलं. त्यामुळे राऊत यांच्या
बोलण्यावरून शिंदे गटाला थेट इशाराच दिल्याची चर्चा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, “महाविकास आघाडी अडीच वर्ष पूर्ण करणार असल्याचा दावा करत
बंडखोर आमदारांच्या निष्ठेची कसोटी लागणार आहे.
कायद्याची, कागदोपत्री आणि रस्त्यावरील लढाई आम्हीच जिंकणार,” असा दावा त्यांनी केला.

“आता आमची वेळ त्यांची वेळ संपली आहे. विधानभवनात महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करेल, पुढची अडीच वर्ष सरकार पूर्ण करेल आणि
निवडूनही येणार आहे.
आम्ही हार मानणार नाही. महाविकास आघाडी सरकार मजबूत असल्याचा,” दावा त्यांनी केला आहे.

यापुर्वी संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या एकनाथ शिंदे यांच्या मागणीवर विचार करु.
तसेच शिंदे गटातील आमदारांनी 24 तासामध्ये परत यावे,’ असं आवाहन केलं.
त्यामुळे राऊत यांच्या विधानामुळे राजकीय समीकरण बदलणार का? यावरही चर्चा होताना दिसत आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | direct warning to eknath shinde group now time has passed maha vikas aghadi government will remain say sanjay raut

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ‘या’ 4 जणांची आमदारकी रद्द करा, शिवसेनेकडून विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

Maharashtra Political Crisis | ‘महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करा’; भाजपचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना पत्र

Related Posts