IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | ‘इतिहास बदलण्याची ताकद एकनाथ शिंदे गटात नाही’ – संजय राऊत

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut slams eknath shinde over dharmveer movie says it was not based on anand dighe

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी
शिंदे गटातील आमदारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास बदलण्याची ताकद शिंदे
गटात (Eknath Shinde Group) नाही. ज्यांना भाजपाचा पुळका होता ते पराभूत झाले. शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde Fadnavis
Government) लोकशाहीची भीती आहे. बंडखोरांनी राजकीय आत्महत्या केलीय. त्यांचा राजकीय अंत लवकरच होईल,’ असा घणाघात राऊत यांनी
केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“बेईमान शेवटपर्यंत सांगतो मी बेईमान आहे. तुम्ही शिवसेना सोडली आहे. शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. स्वत:च्या हिमतीवर निवडून या. तुम्ही तुमचा स्वतंत्र पक्ष स्थापन करा. शिवसेनेच्या पंखाखाली का येताय? जर स्वाभिमानासाठी बाहेर पडलाय तर शिवसेनेशिवाय स्वतंत्र्य स्थान निर्माण करा. शिवसेनेचा गैरवापर करू नका. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली ते शिवसेना-भाजपा युती असताना पराभूत झाले आहेत त्यांना आता भाजपाचा पुळका आला असल्याचा,” टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

पुढे राऊत म्हणाले, “बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. शिवसेनेची ताकद आम्हाला माहितीय.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय खळबळ माजलीय हे माहिती आहे.
शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले आहेत. हे सरकार बेकायदेशीर आहे.
इतके दिवस मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकत नाही. ‘एक दुजे के लिए’ असा सिनेमा राजकारणात सुरू आहे.
त्या सिनेमाचा शेवट कसा झाला सगळ्यांना माहिती असल्याचं,” ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | eknath shinde group does not have the power to change history shivsena mp sanjay raut

हे देखील वाचा :

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांच्या बेसिक सॅलरीत होईल किमान 96000 रुपयांची वाढ, 1 सप्टेंबरपासून होऊ शकते लागू

Vijay Shivtare | शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी

Gopichand Padalkar On Jayant Patil | ‘जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्याचं सुतक’ – गोपीचंद पडळकर

Related Posts