IMPIMP

Shivsena MP Sanjay Raut | ‘CM उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात नेमकी चर्चा काय झालेली ?; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

by Team Deccan Express
 Sambhajiraje Chhatrapati | shiv sena sambhajiraje chhatrapati reaction on eknath shinde maharashtra political crisis

कोल्हापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena MP Sanjay Raut | शिवसेना नेते आणि माजी खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) शिवसंपर्क अभियानासाठी दोन दिवस कोल्हापूर दौ-यावर (Kolhapur News) आहेत. त्यावेळी राऊत यांना राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) 6 व्या जागेच्या संदर्भात संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलेल्या आरोपावर विचारले असता त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ”शिवसेना पुरस्कृत संदर्भात संभाजीराजेंना ठोस आश्वसन दिलं नव्हतं,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) म्हणाले, ”मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केले जाताहेत ते चुकीचं आहे. 6 वी जागा शिवसेनेची आहे. त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा हे आधीच ठरलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संभाजीराजेंना असं सांगितलं होतं की, पुरस्कृत हा विषय आहे त्या संदर्भात मला माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलावं लागेल. मला असं वाटतं हा विषय संपलेला आहे. काल संभाजीराजेंनी आपलं मन मोकळं केलं आहे. आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेतो, उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी निर्णय घेतला की, राज्यसभेवर 2 शिवसैनिक पाठवायचे आणि त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असल्याचं,” ते म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, ”जर 42 मतांचा विषय होता. तुम्हाला जर राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला (राजे, महाराजे, संस्थानिक आहेत त्यांना) कुठल्या तरी पक्षात जावं लागतं. अगदी महाराणा प्रताप यांचे वंशजही एका पक्षात आहेत. राजकीय विचार घेऊनच पुढे जायचं असतं. व्यक्तिगत काही नसतं. आम्ही संभाजीराजेंना विनंती केली पण त्यांनी स्वीकारली नाही. ठीक आहे… आमच्यासाठी विषय संपला,” असंही ते म्हणाले.

त्यावेळी संजय राऊत यांंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि भाजपवरही (BJP) टीका केली आहे. ”चंद्रकांतदादा पाटील कोण ? ते वशंज आहेत का शिवाजी महाराजांचे ? ते कोण ठरवणारे ? त्यांनी आधी 2019 ला मोडलेल्या शब्दाचा आधी खुलासा करावा. शब्द मोडण्याची परंपरा कुणाची आहे. फसवणारे कोण आहेत ? 2019 ला शब्द कुणी दिला होता आणि कुणी मोडला ? यावर आम्ही शक्यतो बोलणं आता टाळतो. आताचा विषय हा संभाजीराजे आणि आमच्यातील आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये.” असं राऊत म्हणाले.

Web Title :- Shivsena MP Sanjay Raut | what discussion held between uddhav thackeray and sambhaji raje about rajya sabha election sanjay raut gives answer in kolhapur

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts