IMPIMP

Shivsena | ‘गुलाबराव पाटील उंदराची चिंधी’, शिवसेना नेत्याचा घणाघात

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) राज्य सरकारवर (State Government) निशाणा साधला जात आहे. शिवसेनेचे (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून राज्य सरकार आणि बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) हल्लाबोल केला जात आहे. याच दरम्यान गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी, ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटीलच उंदराची चिंधी, असं म्हणत पलटवार केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अंबादास दानवे म्हणाले, गुलाबरावांची मागील दोन महिन्यातील भाषणे तपासली तर शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी निर्माण केलेलं सामना वृत्तपत्र आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्र आहे. सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपने (BJP) महत्त्वाची खाती स्वत: कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करु नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करु नये.
ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे.
जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं ? ही कीड शेलारांनी दूर केली आहे का ? असा सवाल दानवे यांनी केला. ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

Web Title : – Shivsena | shivsena ambadas danve slams gulabrao patil over his statement

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मलईदार खाती भाजपकडे, खातेवाटपावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…

SBI ने महाग केले कर्ज, इतके टक्के वाढवले व्याजदर; जाणून घ्या किती वाढणार तुमचा EMI

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Related Posts