IMPIMP

Shivsena | “भाजपचे अनेक नेते तुरुंगात जातील असे गुन्हे असताना देखील…”; सामन्यातून शिवसेनेचा हल्ला

by nagesh
MP Sanjay Raut | devendraji are the daughters of the poor lying on the streets sanjay raut shared the photo itself

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- शिवसेना (Shivsena) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ घोटाळा (Patra Chawl Scam) प्रकरणात दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला. त्यानंतर आज शिवसेनेने (Shivsena), त्यांच्या मुखपत्रातून आज पीएमएलए कोर्टाचे आभार मानत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रातील भाजपचे (BJP) किमान 7 मंत्री, 15 आमदार-खासदार, भाजपास अर्थपुरवठा करणारे बिल्डर्स ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात (Money Laundering Case) आत जातील असे गुन्हे त्यांच्या नावावर आहेत, पण ‘ईडी’(ED) स्वतःच आरोपींची निवड करते, हे न्यायालयाचे म्हणणे अशावेळी सत्य ठरते. विशेष न्यायालयाचे (PMLA Special Court Mumbai) न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे (Justice M. G. Deshpande) यांचे निकालपत्र ऐतिहासिक व मार्गदर्शक ठरते, असे सांगत शिवसेनेने न्यायालयाचे आभार देखील मानले आहेत.

शिंदे-फडणवीस यांच्या समोर जे झुकले नाहीत, ते ईडी-सीबीआयचे अपराधी झाले आहेत,
सध्याचे केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे यावर मुंबईतील विशेष न्यायालयाने
शिक्कामोर्तब केले असल्याचे शिवसेनेने म्हटले. आपल्या देशात एका ज्येष्ठ संसद सदस्याला बेकायदेशीरपणे
अटक करून 100 दिवस तुरुंगात डांबले जात असेल तर कायद्याचे आणि न्यायाचे राज्य देशात नाही.
मानवी अधिकारांचे, स्वातंत्र्याचे हे सरळ हनन असल्याचे शिवसेनेने (Shivsena) म्हटले आहे.

Web Title :- Shivsena | shivsena uddhav thackeray faction mouthpiece saamana praise pmla court bail order and strongly criticized bjp led government

हे देखील वाचा :

Pune Crime | पतीनेच दीराबरोबर संबंध ठेवायला सांगितले; नकार दिल्याने विवाहितेला केली मारहाण, हडपसर परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

Pune Fire News | वानवडीतील आगीत चार घरे जळून खाक

Related Posts