IMPIMP

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

by nagesh
Maharashtra Karnataka Border Dispute | uddhav thackeray declare karnataka occupied maharashtra union territory till court decision uddhav thackeray demand in legislative council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Shivsena Uddhav Thackeray | राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठींबा द्यायचा यावर विचारविनिमय करण्यासाठी आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला शिवसेनेच्या 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदारच उपस्थित राहिले. शिवसेनेला हा आणखी एक धक्का असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत अद्याप संबंधीत खासदार किंवा शिवसेनेकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. (Shivsena Uddhav Thackeray)

 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांकडून यशवंत सिन्हा निवडणूक रिंगणात आहेत. सुरूवातीपासून शिवसेना विरोधकांच्या बाजूने असली तरी शिवसेनेचे काही खासदार भाजपा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देण्याच्या बाजूने आहेत. या निवडणुकीसंदर्भात आज मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेण्यात आले. (Shivsena Uddhav Thackeray)

 

आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर पक्षप्रमुख राष्ट्रपतीपदाच्या कोणत्या उमेदवाराला पाठींबा जाहीर करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, संसदेतील शिवसेनेच्या 22 खासदारांपैकी केवळ 15 खासदार आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थितीत होते.
राज्यसभेतील संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी तर लोकसभेतील 19 पैकी अरविंद सावंत, गजानन कीर्तीकर,
विनायक राऊत, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, हेमंत गोडसे, राहुल शेवाळे, प्रतापराव देशमुख, सदाशिव लोखंडे,
राजन विचारे, राजेंद्र गावित, ओमराजे निंबाळकर आदी 12 खासदार उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह संजय जाधव, संजय मंडलिक, हेमंत पाटील,
कृपाल तुमाने आणि कलाबेन डेलकर हे खासदार मातोश्रीवरील आजच्या बैठकीला अनुपस्थित होते.
राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीत असल्याने बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.
एकुण 7 खासदार अनुपस्थित राहिल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

 

Web Title :- Shivsena Uddhav Thackeray | shiv sena another big blow to uddhav thackeray 7 mps from lok sabha at the meeting on matoshri

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हेदेखीलवाचा:

Dengue Patients-Pune Corona | शहरात कोरोनासोबतच डेंग्युच्या रुग्णांच्या संख्येत वाढ ! डेंग्यु रोखण्यसाठी नागरिकांनी स्वत:च्या घरापासून काळजी घ्यावी; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे आवाहन

Raja Mane | राजा माने यांना सुधारककार आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Maharashtra Political Crisis | बंडखोरांचा गट भाजपात विलीन होणार नाही याची काळजी घ्या; राष्ट्रवादीचा सल्ला

Related Posts