IMPIMP

Shivsena | शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील नेत्याने बोलून दाखवली मनातील खदखद, म्हणाले-‘एवढा मोठा त्याग करुनही पक्षाने…’

by nagesh
Shivsena | why did the party nominate sanjay pawar to the rajya sabha despite making such a big sacrifice says rajesh kshirsagar

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केल्यानंतर पक्षातील आमदार (MLA), खासदार (MP), पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात (Shinde Group) सामील होत आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी शिंदे गटात सामील झाल्यानंतर आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (Late MLA Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur North By-Election) मी एवढा मोठा त्याग केला परंतु पक्षाला माझी राज्यसभेला आठवण झाली नाही, अशा शब्दात त्यांनी खदखद जाहीरपणे बोलून दाखवली. या विधानामुळे शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या राज्यसभेच्या (Rajya Sabha) उमेदवारीला कोल्हापूरातूनच राजेश क्षीरसागर यांच्याकडून विरोध होता हे स्पष्ट होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करत आमदार आणि खासदार यांना आपल्या गटात घेतले. याचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यात देखील झाला अन् शिवसेनेला मोठे खिंडार पडले. कोल्हापूरचे विद्यमान दोन खासदार आणि आमदार यांच्यासोबत माजी आमदार राजेश क्षीरसागर हे शिंदे गटाला जाऊन मिळाले. यावेळी आपण हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्यांवर भाजप (BJP) सोबत गेल्याचे सांगण्यात आले. परंतु हळू हळू सर्वांच्या मनातील खदखद हळू हळू बाहेर येत आहे. राजेश क्षीरसागर यांनी आज आपल्या मनातील खदखद जाहीरपणे बोलून दाखवली.

मातोश्रीचा आदेश म्हणून मी…

कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. परंतु दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आणि तेथे मी जिंकून आलो असतो मात्र एवढे असतानाही मातोश्रीचा आदेश म्हणून मी पोटनिवडणूक लढवली नाही. एवढा मोठा त्याग मी केला मात्र तरीही राज्यसभेच्या निवडणुकीवेळी माझा विचार न करता पक्षाने संजय पवार यांना उमेदवारी दिली, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच…

संजय पवार यांच्यावर निशाणा साधताना राजेश क्षीरसागर म्हणाले, संजय पवार यांनी जिल्ह्याच्या राजकारणात कधीच साथ दिली नाही.
तरीही त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्याचे फळ त्यांना मिळालेच ते निवडून आले नाहीत.
तसेच ज्यांची जनतेतून निवडून यायची लायकी नाही त्यांनीच पक्ष संपवल्याची टीका क्षीरसागर यांनी केली.
तर आम्ही शिवसेना प्रमुखांना (Shiv Sena Chief) सोडले नाही आणि सोडणार नाही.
पण पक्ष कसा चालवावा हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून शिकावे, अशी टीका त्यांनी केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Shivsena | why did the party nominate sanjay pawar to the rajya sabha despite making such a big sacrifice says rajesh kshirsagar

हे देखील वाचा :

Pune Crime | चुहा गँगच्या म्होरक्यासह टोळी भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात

Pune PMC NEWS | कोरोनाच्या साथीमध्ये बँक बॅलन्स ‘मायनस’ झाला ! महापालिका शाळेतील 7 हजार विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ‘डीबीटी’द्वारे पैसे मिळण्यात अडचण

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचा टोला, म्हणाले – ‘मी फिक्स मॅच पाहत नाही, लाईव्ह मॅच पाहतो’

Related Posts